जगभरात भारतातच केवळ सापांची पूजा केली जाते. त्यांचे मंदिर बनवले जाते, त्यांना देवाप्रमाणे पूजले जाते आणि ‘नागपंचमी’ हा सणही साजरा करून त्यासाठी व्रतही ठेवले जाते. सापाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा-कहाण्याही आहेत.आपल्या देशात जिथे सापांची पूजा होते, तिथे असेही म्हटले जाते की, जर कधी सापासोबत अन्याय झाला, त्याला त्रास दिला गेला, तर त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी साप पुन्हा परततात. ते पिढ्यान्पिढ्या ‘कालसर्प योग’ बनून तुमचा पाठलाग सोडत नाहीत, अशीसुद्धा मान्यता आहे. ‘कालसर्प दोष’च्या रूपात जन्मपत्रिकेत याचे उदाहरण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही आपल्या पाहायला मिळते.अशीच एक कहाणी कलर्स वाहिनीवर आहे, ज्यामध्ये एक नागीण शंभर वर्षांच्या तपश्चर्येनंतर इच्छाधारी होण्याचे वरदान प्राप्त करून, आपला सूड उगविण्यासाठी परतली आहे. शंभर वर्षांपूर्वी असे काय घडले होते, ज्याचा प्रतिशोध घेण्यासाठी नागिणीला करावी लागली शंभर वर्षांपर्यंत तपश्चर्या? आता ती आपला सूड कसा घेईल? याचे परिणाम जाणून घेण्यासाठी ‘प्रेम आणि सुडाची कहाणी-नागीण’ कलर्स वाहिनीवर पाहता येईल. १ नोव्हेंबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वा. ही मालिका सुरू होत आहे.
एका नागिणीच्या सुडाची कहाणी!
By admin | Published: October 31, 2015 12:32 AM