Join us

दुसऱ्या लग्नाची गोष्ट!, मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दोन वेळा चढले बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:00 IST

मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले व त्यांनी लग्नगाठदेखील बांधली.

बऱ्याचदा कलाकारांच्या रिलेशनशीप आणि ब्रेकअप्सच्या चर्चा ऐकायला मिळत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले व त्यांनी लग्नगाठदेखील बांधली. यात महेश मांजरेकरपासून शशांक केतकर या कलाकारांचा समावेश आहे.

स्नेहा वाघ‘बिग बॉस मराठी ३’ ची स्पर्धक स्नेहाचे अभिनेता आविष्कार दारव्हेकर सोबतचे लग्न टिकले नाही. तिचे अनुराग सोळंकी बरोबरचे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.

महेश मांजरेकरबिग बॉसच्या चावडीवर प्रत्येक स्पर्धकाची हजेरी घेणाऱ्या महेश मांजरेकर यांची मेधा ही दुसरी पत्नी आहे. त्यांचे पहिले लग्न हे कॉश्च्युम डिझायनर दीपा मेहता सोबत झाले होते.

गिरीश ओक‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री असून घटस्फोटानंतर त्यांनी पल्लवी बरोबर लग्न केले.

शशांक केतकर'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०१४ साली दोघांनी लग्न केले. मात्र लग्नाच्या वर्षभरातच ते विभक्त झाले. नंतर शशांकने प्रियांका ढवळेशी विवाह केला.

शर्मिष्ठा राऊत‘मुलगी झाली हो’ मालिकेतील पाहुणी कलाकार शर्मिष्ठा राऊतने अमेय बरोबरचे लग्न मोडल्यानंतर तेजस देसाई सोबत लग्न केले.

स्वप्नील जोशी‘चला हवा येऊ द्या’ मधील स्वप्नील जोशीने अपर्णा बरोबरचं लव्हमॅरेज मोडल्यानंतर लीना आराध्ये सोबत अरेंज मॅरेज केले.

अभिज्ञा भावे‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिज्ञाचं मेहुल पै बरोबरचं दुसरं लग्न आहे. त्या आधी तिने वरुण बरोबर लग्न केले होते.

सोनाली कुलकर्णीसोनाली कुलकर्णीने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी बरोबरचे लग्न मोडल्यानंतर नचिकेत पंतवैद्य बरोबर लग्न केले.

रेणुका शहाणेदिग्दर्शक विजय केंकरे सोबतचा आपला संसार मोडल्यानंतर रेणुका शहाणेने अभिनेता आशुतोष राणा सोबत लग्नगाठ बांधली.

टॅग्स :महेश मांजरेकर स्रेहा वाघशशांक केतकरअभिज्ञा भावेसोनाली कुलकर्णीरेणुका शहाणे