सध्या वेगवेगळ्या हिंदी वेबसीरिजनी सोशल मीडियात एकच धुमाकूळ घातलेला असताना यात एक मराठी वेबसीरिज चर्चेचा विषय ठरत आहे. ती वेबसीरिज म्हणजे 'स्त्रीलिंग पुलिंग'. शुद्धदेसी मराठीच्या या वेबसीरिजची ट्रेलर लॉन्च झाल्यापासून कमालीची उत्सुकता वाढली होती. लोकप्रिय आणि यंग कलाकारांची टीम असलेल्या वेबसीरिजमध्ये काय असेल याची चर्चा रंगली होती. त्यानंतर या वेबसीरिजचा पहिल्या एपिसोड रिलीज करण्यात आला आणि एकच धमाका उडाला. या एपिसोडमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिक ताणली गेली आहे. उद्या या गाजत असलेल्या वेबसारिजचा दुसरा धमाकेदार एपिसोड प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी रिलीज केला जाणार आहे.
पहिला एपिसोड पाहून या वेबसीरिजची, यातील पात्रांची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. बहुदा ही हिंदी वेबसीरिजच्या लाटेत इतकी चर्चेत राहणारी पहिली मराठी वेबसीरिज असावी. याचा पहिला एपिसोड फेसबुक आणि इतर सोशल अकाऊंटवर रिलीज करण्यात आला होता. आता यावेळी फेसबुक आणि यूट्यूबवर दुसरा एपिसोड रिलीज करण्यात येणार आहे.
किती लोकांनी पाहिला पहिला एपिसोड?
१६ डिसेंबरला या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांना इतका आवडला की, केवळ १५ दिवसात हा ट्रेलर ३० लाख लोकांनी पाहिला. तर ३ जानेवारीला रिलीज करण्यात आलेला या वेबसीरिजचा पहिला एपिसोड केवळ ६ दिवसात ८ लाख लोकांनी पाहिला. यावरुन या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून मिळालेली पसंती लक्षात येते. एकूण सहा एपिसोड असणाऱ्या 'स्त्रीलिंग पुलिंग' या वेबसीरिजला सध्या राज्यभरातून प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात या वेबसीरिजचा पहिला एपिसोड फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि शेअरचॅटवर रिलीज करण्यात आला होता. या पहिल्याच एपिसोडवर लोकांनी उड्या घेतल्या.
खालील लिंकवर क्लिक करुन बघा पहिला एपिसोड
काय आहे कथा?
पल्लवी एक साधी-सरळ आणि सोज्वळ मुलगी... तिच्या जीवनात अचानक आलेल्या एका वादळाने ती पुरती हादरुन जाते. यातून कसं बाहेर यावं किंवा हे वादळ कसं रोखावं हे तिला सुचेनासं होतं. अशातच ती तिच्या दोन बेस्ड फ्रेन्ड प्रिया आणि अर्चना यांची भेट घेते. या मेत्रिणी काहीतरी मदत करतील या उद्देशाने घाबरलेली पल्लवी त्यांना तिच्यासोबत घडलेल्या नेमक्या प्रकाराबाबत सगळंकाही सांगते. पल्लवीसोबत घडलेला प्रकार ऐकून तिच्या मैत्रिणीही हादरतात आणि तिला मदत करण्याचा निर्णय घेतात. मग काय? या तिघी मेत्रिणी या सर्व गोंधळामागे असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला लागतात. मग पुढे काय होतं? पल्लवीसोबत काय घडलं? यातून ती कशी बाहेर येते? तिला यातून बाहेर कोण काढतं? हे दाखवणारी कथा या 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजची आहे.
'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचं लेखन-दिग्दर्शन 'चौर्य', 'यंटम' आणि 'वाघेऱ्या' या सिनेमाचं दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील यांनी केलं आहे. तर यात निखील चव्हाण, भाग्यश्री न्हालवे, सायली पाटील, आरती मोरे आणि ऋतुराज शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
कुठे बघाल वेबसीरिज?
या वेबसीरिजचा उद्या रिलीज होणारा दुसरा एपिसोड पाहण्यासाठी लॉग ऑन करा खालील दिलेल्या लिंकवर....
फेसबुक पेजhttps://www.facebook.com/ShudhDesiMarathi/
यूट्यूबhttps://www.youtube.com/shudhdesimarathi/
शेअरचॅट App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://b.sharechat.com/salman