Join us

जोरदार ‘फॅन’ पण दुबळा सुपरस्टार

By admin | Published: April 16, 2016 1:18 AM

कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला चाहते किती आहेत हेच महत्त्वाचे असते. विशेषत: चित्रपट ताऱ्यांसाठी तर तेच सर्वस्व असतात. त्यांचे चाहतेच त्यांना आपल्या हृदयात बसवतात व त्यांचे जणू

- अनुज अलंकारहिंदी चित्रपट - फॅनकोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाला चाहते किती आहेत हेच महत्त्वाचे असते. विशेषत: चित्रपट ताऱ्यांसाठी तर तेच सर्वस्व असतात. त्यांचे चाहतेच त्यांना आपल्या हृदयात बसवतात व त्यांचे जणू त्यांना वेड लागते. तो कलावंत स्टारडमच्या शिखरावर जातो. यशराजचा ‘फॅन’ बॉलीवूडचा सुपर स्टार आणि त्याचा दिल्लीतील चाहता यांच्यातील नात्यावर आधारित आहे.कथा बॉलीवूडचा सुपरस्टार आर्यन खान (शाहरुख खान) आणि त्याचा दिल्लीत राहणारा चाहता गौरव चनाना (शाहरुख खानची दुहेरी भूमिका) यांची आहे. गौरव लहानपणापासूनच आर्यनच्या स्टारडमचा चाहता होता. गौरव हळुहळु मोठा होत जातो तसे त्याचे आर्यनबद्दलचे वेड वाढतच जाते. आपल्या कॉलनीत आर्यनच्या लकबींची कॉपी करून करून प्रसिद्ध झालेला गौरव ठरवतो, की यावेळी आर्यनच्या वाढदिवशी त्याच्या भेटीसाठी दिल्लीला जायचे. आर्यनची नक्कल करताना गौरव विनातिकीट दिल्लीहून मुंबईत पोहोचतो आणि आर्यन पहिल्यांदा मुंबईत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्याच हॉटेलमध्ये थांबतो. आर्यनच्या वाढदिवशी लक्षावधी चाहते त्याच्या घराबाहेर जमतात. पहिल्यांदा आर्यनला बघितल्यानंतर गौरवला प्रचंड आनंद होतो. तो पाच मिनिटे आर्यनला भेटू इच्छितो, परंतु तसे होत नाही. आर्यनला खूश करण्यासाठी गौरव दुसऱ्या कलाकाराला जबर मारहाण करतो; कारण काय तर तो आर्यनबद्दल वाईट बोललेला असतो. गौरवच्या या कृत्याची माहिती आर्यनला कळते तेव्हा तो पोलिसांची मदत घेतो. गौरव दिल्लीला परत जावा, असे त्याला वाटते. पोलीस गौरवला मारहाण करतात. ती आर्यनच्या सांगण्यावरून झाली, असे गौरवला समजते तेव्हा तो दुखावतो. तेथून गौरवचे आर्यनबद्दलचे वेड वेगळ््या मार्गाने बाहेर पडू लागते. गौरवच्या डोक्यात आता एकच गोष्ट असते, ती ही की आर्यनने त्याला ‘सॉरी’ म्हणावे. मग त्यासाठी तो काहीही करील. एक वर्षानंतर गौरव आर्यनचा पाठलाग करीत लंडनला पोहोचतो आणि तेथे अशा काही गोष्टी करतो, की आर्यनपुढे संकटे उभी ठाकतात. गौरवला पकडण्याचे त्याचे अनेक प्रयत्न वाया जातात. गौरवच्या डोक्यातील ‘सॉरी’ काही केल्या दूर व्हायला तयार नसते. तो मग मुंबईत आर्यनच्या घरी पोहोचतो. येथे आर्यनचा संयम संपून जातो व तो दिल्लीच्या या मुलाला दिल्लीच्या स्टाईलने धडा शिकवायचा निर्णय घेतो. दिल्लीला येऊन आर्यनही अशा काही गोष्टी करतो, की गौरवची बदनामी सुरू होते. मग या दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होतो व त्याचा परिणाम वाईट असतो.चित्रपटाचा उणिवा : मनीष शर्माचे दिग्दर्शन आणि हबीब फैसल (हे स्वत: दिग्दर्शकही होते.) यांनी लिहिलेली पटकथाच या चित्रपटाचा कमकुवतपणा आहे. चित्रपटाची सुरुवात चांगली होऊनही अवघ्या २० मिनिटांनंतर तो अडखळायला लागतो. यामुळे गौरव आणि आर्यन यांच्यातील नात्यात लेखक काही समतोल राखू शकला नाही.आर्यनच्या वाढदिवशी गौरव मुंबईत येईपर्यंत चित्रपट चांगला झाला आहे. पण त्यानंतर पुढे काय करावे, हे हबीब फैजल यांना समजलेले नाही. त्यामुळे त्यांनी लांब लांब सिक्वेन्स बनविले आणि चित्रपटाला खूपच फिल्मी केले. दुसऱ्या कलाकाराला मारहाण करण्याच्या प्रकाराने चित्रपट रुळावरून घसरायला सुरुवात होते. त्यानंतर आर्यनने पोलिसांची मदत घेणे आणि स्वत: तुरुंगात जाऊन गौरवची भेट घेणे यामुळे चित्रपट नाटकी होतो. पहिल्या हाफनंतर दुसरा हाफही रंगतदार होईल अशी आशा निर्माण होते; पण येथूनच चित्रपट निराशा करतो.लंडनमध्ये ज्या पद्धतीने आर्यन गौरवचा पाठलाग करतो, ते पाहता त्याची ही कृती त्याच्या स्टारडमला शोभणारी नाही. लंडन पोलिसांचा ड्रामाही दुबळा आहे. मुंबईत परतल्यानंतर गौरवचे आर्यनच्या घरी जाणे व त्याच्या बेडरूममध्ये प्रवेश करणे वाईट ठरते. दिल्लीला जाऊन आर्यनने गौरवसारखी वर्तणूक करणे पटत नाही. गौरव आणि आर्यन यांच्यातील पाठलगाचे दृश्य शाहरुख खानच्या ‘डर’ची तर कधी ‘अंजाम’ची आठवण करून देतात. क्लायमॅक्स तर फारच वाईट झाला आहे. चित्रपट संपविण्याच्या नादात सर्वांनी शस्त्रे टाकल्यासारखे वाटते. आर्यन किंवा गौरव या दोघांपैकी एकालाही प्रेक्षकांची सहानुभूती मिळत नाही, हे या चित्रपटाचे सर्वात मोठे अपयश आहे. कारण दोघांपैकी एकाचीही भूमिका प्रेक्षकांशी भावनिकदृष्ट्या जोडली जात नाही. दिग्दर्शक या नात्याने मनीष शर्मा यांनी एक मोठी संधी गमावली आहे. चित्रपटात गाण्याचे कुठेही ताळतंत्र नाही.