Join us

व्हीस्लिंग वूडचे विद्यार्थी बनले 'बोगदा'चे शिल्पकार !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 1:49 PM

कोणत्याही क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानाला जेव्हा सखोल अभ्यासाची जोड लाभते तेव्हा उत्कृष्ट कलाकृती जन्मास येते असं म्हणतात. अशाच या  महत्वाच्या बाजूंची सांगड सध्याची तरुण पिढी घालु पाहत आहे.

ठळक मुद्देमृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे

कोणत्याही क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानाला जेव्हा सखोल अभ्यासाची जोड लाभते तेव्हा उत्कृष्ट कलाकृती जन्मास येते असं म्हणतात. अशाच या  महत्वाच्या बाजूंची सांगड सध्याची तरुण पिढी घालु पाहत आहे. मराठी सिनेप्रेक्षकांसाठी लवकर आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा बोगदा सिनेमा घेऊन येत असलेले व्हीस्लिंग वूडचे तरुण शिलेदार याचं उत्तम उदाहरण आहेत . 

हिंदीचे सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक सुभाष घई यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'व्हीस्लिंग वूड' ही चित्रपट कार्यशाळा भारतातील अग्रेसर फिल्म इंस्टीट्युटपैकी एक आहे. व्हीस्लिंग वूडने मनोरंजन सृष्टीला आजवर अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. येत्या ७ सप्टेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या बोगदा चित्रपटाची नितीन केणी यांनी प्रस्तुती केली असून या  सिनेमाह्या ची दिग्दर्शिका निशिता केणी स्वतः  मुंबईस्थित व्हीस्लिंग वूडची विद्यार्थिनी आहे.तसेच सिनेमाचा छायाचित्रकार प्रदीप विग्नवेळू, संकलक पार्थ सौरभ, ध्वनी मुद्रणकार कार्तिक पांगरे आणि वेशभूषाकार यश्मिता बाने या पडद्यामागच्या महत्वाच्या शिलेदारांनादेखील व्हीस्लिंग वूडचेच संस्कार लाभले आहेत.

या सिनेमात मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.  सिनेमाचे निर्माते करण कोंडे हे देखील व्हीस्लिंग वूडचे माजी विद्यार्थी असून, सुरेश पानमंद, नंदा पानमंद आणि दिग्दर्शिका निशिता केणी या चौकडीने मिळून 'बोगदा' सिनेमाची निर्मिती केली आहे. जन्म आणि मृत्यू या आयुष्यातील दोन दरवाजांमधील 'बोगदा' दाखवणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नवा वैचारिक दृष्टीकोन देणारा ठरणार आहे, हे नक्की बोगदा हा सिनेमा आई आणि मुली यांच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर मध्ये त्यांच्यातील हळूवार नाते आपल्याला पाहायला मिळत आहे.

टॅग्स :बोगदा