‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर काठावर पास! कुणी म्हटले झक्कास तर कुणी बकवास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 02:06 PM2019-04-12T14:06:29+5:302019-04-12T14:07:14+5:30

टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे.

student of the year 2 trailer out social media reactions | ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर काठावर पास! कुणी म्हटले झक्कास तर कुणी बकवास!!

‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर काठावर पास! कुणी म्हटले झक्कास तर कुणी बकवास!!

googlenewsNext
ठळक मुद्देचंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
ट्रेलरमधील टायगर श्रॉफची ‘बागी’ स्टाईल पाहून सोशल मीडियाचे काही युजर्स उत्साहित आहेत. तर काहींनी या ट्रेलरला अगदी काठावर पास केले आहे. काही युजर्सला ‘दिन तेरा है, साल मेरा होगा’ हा डायलॉग प्रचंड आवडला. तर काहींना अजिबात आवडला नाही. अनेकांनी ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ची ‘स्टुडंट ऑफ द ईअर’शी तुलना केली. इतकेच नाही तर काहींनी या ट्रेलरची तुलना करत आमिर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’चे गोडवे गायले.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा हा सिनेमा पुनीत मल्होत्राने दिग्दर्शित केला आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटातही एक जुने गाणे रिक्रिएट केले गेले आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर’प्रमाणे ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ यातही प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. हा प्रेम त्रिकोण चाहत्यांना किती आवडतो, ते लवकरच कळेल. त्याआधी ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर एक नजर टाकुयात...

Web Title: student of the year 2 trailer out social media reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.