Join us  

स्टाइल म्हणजे कम्फर्ट- स्वप्निल जोशी

By admin | Published: December 23, 2016 2:37 AM

माझ्यासाठी माझी स्टाईल हीच माझी स्टाइल असते. जे कपडे परिधान करुन तुम्हाला मजा वाटते, आनंद मिळतो, कम्फर्टेबल वाटते

माझ्यासाठी माझी स्टाईल हीच माझी स्टाइल असते. जे कपडे परिधान करुन तुम्हाला मजा वाटते, आनंद मिळतो, कम्फर्टेबल वाटते शिवाय वावरायलाही सोपे जाते ती माझ्यासाठी खरी स्टाइलची व्याख्या आहे. माझ्या फॅन्सना वाटते की खूप स्टायलिश आहे. मात्र याचे खरे श्रेय माझे नसून माझ्या फॅशन डिझायनर्स, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट यांना जाते. ते माझ्यावर बरीच मेहनत घेतात. मी आकर्षक दिसावे आणि माझे व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी ते झटत असतात. त्या सगळ्यांना माझे स्टायलिस्ट असण्याचे सारे श्रेय जाते. स्टाइलची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते. माझ्यासाठी स्टाइल म्हणजे कम्फर्ट. टी-शर्ट आणि जीन्समध्ये ज्यात मी स्वत:ला खूप कम्फर्टेबल समजतो. एकदा मी माझ्या बायकोलाही गंमतीने म्हटले होते की तिने परवानगी दिली असती तर लग्नातही मी टी-शर्ट आणि जीन्स घालूनच फिरलो असतो. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स हे माझे फेव्हरेट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एखाद्या स्टाइलमध्ये किती कम्फर्टेबल आहात हे महत्त्वाचे असते. माझ्या कपाटामध्ये तर तुम्हाला खूप सारे गॉगल्स, बरीच घड्याळे पहायला मिळतील. मी घड्याळांचा प्रचंड शौकीन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मला छोटे नवाब सैफ अली खानची ड्रेसिंग स्टाइल खूप आवडते. शाहरुख खानचीही फॅशनस्टाइल मला भावते. शाहरुख तर माझ्यासाठी स्टाइल आयकॉन आहे. शिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांचीही स्टाइल तितकीच स्पेशल आहे. कारण ते उभे जरी राहिले तरी ती त्यांची स्टाइल बनते. मराठी चित्रपटसृष्टीत सई ताम्हणकरचा फॅशन सेन्स मला भावतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतात की जे आपापल्या परीने फॅशन आणि स्टाइल रुढ करत असतात.