Join us

'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याकडे पाहून दिग्दर्शकाला सुचली 'कबीर सिंग'ची स्टाइल; संदीप रेड्डी वांगाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:57 IST

संदीप रेड्डी वांगाने नुकत्याच एका इव्हेंटमध्ये कबीर सिंगची स्टाइल एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यावरुन बेतली असल्याचा खुलासा केलाय (sandeep reddy vanga)

'कबीर सिंग' (kabir singh) सिनेमा आठवत असेलच. २०१९ सिनेमा रिलीज झालेला 'कबीर सिंग' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. 'कबीर सिंग'मध्ये शाहिद कपूरच्या (shahid kapoor) अभिनयाचं कौतुक झालं. 'कबीर सिंग'मधली कथा, गाणी आणि इतर अनेक गोष्टींची चर्चा झाली. याशिवाय शाहिद कपूरने परिधान केलेल्या कपड्यांचं चांगलंच कौतुक झालं. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने 'कबीर सिंग'ची स्टाइल एका लोकप्रिय अभिनेत्यावरुन सुचली असल्याचा खुलासा केला.

'कबीर सिंग'ची स्टाइल कोणावरुन घेतली?

शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग'चे टी शर्ट, जीन्स आणि त्यावर गॉगल अशा गोष्टींचीही चांगलीच चर्चा झाली. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा नुकतेच साई पल्लवी आणि नागा चैतन्यच्या आगामी 'थंडेल' सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्यावेळी संदीप रेड्डी वांगा म्हणाला की, "मी हे कधी सांगितलं नाही पण आज सांगतो. शाहिद कपूरचा कबीर सिंग आणि रणबीर कपूरचा अॅनिमलमधील लूक नागा चैतन्यच्या स्टाइलवर बेतलेला आहे."

संदीप रेड्डी वांगाच्या खुलाश्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या आगामी 'थंडेल' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटला संदीव वांगा साई पल्लवीबद्दल म्हणाले की, "मला अर्जुन रेड्डी सिनेमात साई पल्लवीला कास्ट करायचं होतं. पण डेट्स जुळल्या नाहीत म्हणून मला तिला सिनेमात कास्ट करता आलं नाही." अशाप्रकारे संदीप रेड्डी वांगा यांनी खुलासा केला. संदीप यांचा आगामी सिनेमा 'स्पिरीट'ची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात प्रभास प्रमुख भूमिकेत आहे.

 

टॅग्स :कबीर सिंगशाहिद कपूरबॉलिवूडTollywood