Join us

स्टाइल स्टेटमेंट ठरवते आपले व्यक्तिमत्त्व - उमेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 3:28 AM

माझ्यासाठी स्टाइल ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणत्याही व्यक्तीला बघता त्याचा पहिला अपरिएन्स दिसतो. जेव्हा कधी लांबून कोणत्या व्यक्तीला

माझ्यासाठी स्टाइल ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणत्याही व्यक्तीला बघता त्याचा पहिला अपरिएन्स दिसतो. जेव्हा कधी लांबून कोणत्या व्यक्तीला बघतो तेव्हा आपली नजर त्याच्या कपड्यांकडे जाते त्याने कसा पेहराव केलाय या सगळ्या गोष्टींवर सहजच आपली नजर पडते. तेव्हा समोरच्याच अचानक वॉव फॅक्टर आपल्या लक्षात येतो. तुमचा एटीट्युड कळतो तो तुमच्या स्टाइलमुळे. ग्लॅमर इंडस्ट्री म्हटले की फॅशन ही आलीच त्यामुळे फॅशन सेन्स डेव्हलप असणे खूप महत्त्वाचे असते. आपल्याकडे मी बरऱ्याचदा बघितलेय. पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी काहीही ड्रेसिंग करून येतात. मात्र आॅस्कर पुरस्कार सोहळा बघितला तर प्रत्येक कलाकार हा ड्रेसकोड फॉलो करताना दिसतो. ब्लॅक अँड व्हाईट रंगाचे गाउन किंवा सूट घालत कलाकार हजेरी लावतात आपल्यालाही बघता क्षणी खूप सुपर्ब वाटते. सिनेमातही एखादी भूमिका एकदम लक्षात राहते त्यात त्याची स्टाइलचाही तितकाच मोठा वाटा असतो. त्या कलाकराने त्या भूमिकेसाठी केलेल्या कपड्यांची स्टाइलपासून ते हेअर स्टाइलपर्यंत त्याची अनेक जण कॉपी करताना दिसतात. हे सगळे त्या स्टाइल स्टेटमेंटचाच कमाल असतो. आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे आपले व्यक्तिमत्त्व बाहेर येण्यास मदत होते. माझ्या मोठ्या भावाचा गार्मेंटचा व्यवसाय आहे. त्याच्या फॅक्टरीतले कपडे तो इंटरनॅशनल लेव्हला एक्सपोर्ट होतात. जेव्हा एखादी कंपनी कपडे एक्सपोर्ट करते तेव्हा तीन वषार्नंतर कोणती फॅशन येणार हे त्या कंपनीने आधीच ठरलेलं असतं. सो मला तिथून ब-याच स्टाइल स्टेटमेंटची माहिती मिळत असायची. आमच्या घरात साडी, शर्ट, पँट पिसचा बिझनेस होता. त्यामुळेही मला कळायला लागले की कपड्यांचा रंग निवडताना कसा निवडावा त्याची क्वॉलिटी काय असावी हे घरातूनच कळत गेले. त्यानंतर फिल्मइंडस्ट्रीमध्ये एंट्री केल्यानंतर मला एहमद खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तो माझ्यासाठी स्टाइल आयकॉन आहे. कारण त्याला त्याची स्टाइल खूप चांगल्यारितीने समजली होती. रंगीला सिनेमात ''याई रे... याई रे'' या गाण्यातील कलाकारांचा लुक्स, ड्रेसिंग स्टाइल, डान्सिग स्टाइल पहिल्यांदाच सिनेइंडस्ट्रीत दिसली होती.