मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एकही चित्रपट तिकीट बारीवर फारसा टिकला नाही. त्याचा फायदा ‘बागी’ चित्रपटाला झाला. तर मनोज वाजपेयीचा ‘ट्रॅफिक’ आणि सनी लिओनचा ‘वन नाईट स्टॅण्ड’ या दोन चित्रपटांच्या तुलनेत विक्रम भट्ट यांच्या ‘१९२० लंडन’ या भयपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्याअखेर ‘१९२० लंडन’ या चित्रपटाने ४ कोटींचा गल्ला कमावला. तथापि, ट्रॅफिक आणि वन नाईट स्टॅण्डची स्थिती कमाईच्या बाबतीत जेमतेम राहिली.टायगर श्रॉफच्या ‘बागी’ने पहिल्या आठवडाअखेर ३८ कोटींची कमाई करीत तिकीट बारीवर धडाकेबाज सुरुवात केली. आतापर्यंत ६७ कोटी कमावत ‘बागी’ने या वर्षातील यशस्वी चित्रपटाच्या पंक्तीत स्थान मिळविले. नवीन चित्रपट पडल्याचा फायदा ‘बागी’ला मिळाल्याचे दिसते. येत्या शुक्रवारी माजी क्रिकेटपटू अज़हरुद्दीनच्या जीवनावर आधारित ‘अज़हर’ झळकणार आहे. इमरान हाश्मी अज़हरच्या भूमिकेत आहे. यासोबतच ‘रोजा’फेम अरविंद स्वामीचा ‘डियर डॅड’ आणि विवेक अग्निहोत्रीचा ‘बुद्धा इन ए ट्रॅफीक जाम’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
‘बागी’ बॉक्स आॅफिसवर यशस्वी
By admin | Published: May 10, 2016 12:46 AM