बऱ्याचवेळा ज्या अभिनेत्रींना घेऊन चित्रपट तयार करायचा असतो, त्या उपलब्ध होत नाहीत. मग त्यांचे नाव मागे पडून पर्यायी अभिनेत्रींचा विचार केला जातो आणि कधीकधी तो यशस्वीही होता. अशा पद्धतीने अशा काही अभिनेत्रींचे करिअर अधिक चांगले ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. २०१४ साली बँग बँग हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला. त्याचा सिक्वल आता येतो आहे. मूळ चित्रपटात असणाऱ्या कतरिना कैफऐवजी सिक्वलमध्ये जॅकलिन फर्नांडिसला घेण्यात आलंय. असं अनेक चित्रपटात झालंय. त्यापैकी काही चित्रपटांची ही कहाणी.मूळ निवड-जेनेलिया डिसुझा. पर्याय-प्राची देसाई (चित्रपट-बोल बच्चन)आपल्या बोल बच्चन या चित्रपटासाठी जेनेलिया डिसुझाची निवड करणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीने नंतर तिच्याऐवजी प्राची देसाईची निवड केली. जेनेलियाच्या तारखा नवदीप देसाईच्या शादी आॅफ द डेडशी मिळत्याजुळत्या होत्या. रोहित शेट्टी तारखांबाबत कोणतीही माघार घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याने प्राचीला चित्रपटात घेतले. हा चित्रपट ब्लॉक बस्टर होऊन १०० कोटींच्या क्लबमध्ये गेला. मूळ निवड-करिना कपूर. पर्याय-प्रीती झिंटा (चित्रपट-कल हो ना हो)कल हो ना हो या चित्रपटासाठी करण जोहरने बेबोला निवडले होते. त्यावेळी करिना ही मोठ्या उंचीवर होती आणि तिने अधिक पैशांची मागणी केली. त्यामुळे करिनाच्या जागी प्रिटीची निवड करण्यात आली. कल हो ना हो बिग हिट ठरला आणि प्रिटीचे करिअरही अधिक उंचावले. मूळ निवड-करिना कपूर. पर्याय-अमिशा पटेल (चित्रपट-कहो ना प्यार है)करिना कपूर तिच्या चित्रपट करिअरची सुरुवात हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने करणार होती. सोनियाच्या भूमिकेत तिने चित्रपटाची शूटिंगही सुरूकेली होती. नंतर तिला वाटू लागले की हा चित्रपट निव्वळ हृतिकसाठी तयार करण्यात आला आहे आणि ती बाजूला पडते आहे. त्यामुळे ती चित्रपटाबाहेर पडली. बेबोने आपल्या कारकिर्दीची सुरुवात अभिषेक बच्चनसोबत नंतर ‘रिफ्युजी’ने केली. सोनियासाठी अमिशाची निवड करण्यात आली.मूळ निवड- रिंकी खन्ना. पर्याय-मनीषा कोईराला. (चित्रपट-कंपनी)या चित्रपटाचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी सुरुवातीला रिंकी खन्ना हिला करारबद्ध केले होते. रिंकीने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली होती, मात्र या भूमिकेसाठी ती अधिकच तरुण दिसत असल्याने तिच्या ऐवजी पर्याय म्हणून मनीषा कोईराला हिला करारबद्ध करण्यात आले. मूळ निवड-रेखा. पर्याय-तब्बू (चित्रपट-फितूर)चार्ल्स डिक्सनच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन’वर आधारित होता दिग्दर्शक अभिषेक कपूरचा ‘फितूर’ चित्रपट. काही कारणास्तव हा चित्रपट अडगळीस पडला. रेखाने या चित्रपटाचे काही शूटिंगही केले, मात्र काही कारणाने ती बाहेर पडली आणि तब्बू चित्रपटात आली. काहींच्या मते रेखाला वयोवृद्ध दिसणाऱ्या भूमिका करावयाच्या नसल्याने ती बाहेर पडली.मूळ निवड-स्मृती इराणी. पर्याय-सुप्रिया पाठक (चित्रपट-आॅल इज वेल)स्मृती इराणी यांनी या चित्रपटास सुरुवातही केली होती, मात्र राजकीय व्यस्ततेमुळे त्या बाहेर पडल्या. त्यांच्या जागी दिग्दर्शक आणि निर्मात्याने सुप्रिया पाठकची निवड केली. या चित्रपटात अभिषेक बच्चन, ऋषी कपूर आणि असीन हे मुख्य भूमिकेत आहेत.
पर्यायी अभिनेत्रींचे यशस्वी करिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2015 12:12 AM