अशा लोकांना जबर दंड ठोठवायला हवा- मकरंद अनासपुरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 02:13 PM2021-02-15T14:13:12+5:302021-02-15T14:15:45+5:30
आपण पाहतो सर्रास लोकं नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. वाहतुकीचे नियम आज सगळ्यानाच माहिती आहेत मात्र तरीही ते तोडले जातात.
आपल्या आजुबाजुला शिस्त कशी राखली जाईल ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असते. पण तरी काही लोकांना अजिबात फरक पडत नाही. कोरोना काळात सरकारडून जारी केलेले नियम धाब्यावर बसवत काही लोक घराबाहेर निवांत फिरत होते. प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून वागले पाहिजे .मात्र हेच आज आपण विसरलेले आहोत. आपण पाहतो सर्रास लोकं नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. वाहतुकीचे नियम आज सगळ्यानाच माहिती आहेत मात्र तरीही ते तोडले जातात.
वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर कठोर कायद्यांचा बडगाही उगारावा', नियम अटी या सगळ्या आपल्याच सुरक्षेसाठी आहेत हे माहिती असूनही काही लोक अगदी बेशिस्तसारखे वागतात. विना हेल्मेट घालणा-यांवर तर जबर दंड ठोठायला हवा. जबाबदारीने वागणे आपले कर्तव्य आहे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले विचार मांडले.
अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज; अभिनेते मकरंद अनासपूरे यांचे प्रांजळ मत
विस्तारणा-या महानगरांसोबत रस्तेही विस्तारले आहेत. परंतु, त्यावर असंख्य खड्डे असतात. खड्डे चुकविताना आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. आपल्या सुरक्षेची काळजी आणि अपघाताची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे येणार नाही. ही खबरदारी आपल्यालाच घ्यायची आहे. कोरोना संक्रमाणाच्या काळात आपण तोंडावर मास्क घालायला आणि सॅनिटायझर्स वापरायला शिकलो. तसेच, मोटारसायकल चालविताना कायम हेल्मेट घालायलाही शिका, असा सल्लाही अनासपूरे यांनी दिला. प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर वाहतूक पोलिसांना अशा जनजागृती मोहिमा राबवाव्या लागणार नाहीत. तो दिवस लवकरच येईल, अशी आशा अभिजीत खांडकेकर यांनी व्यक्त केली.