Join us

4 वर्ष कुठे गायब होती निया शर्मा? मालिका विश्वात पदार्पण करत म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:20 IST

Nia sharma: अलिकडेच नियाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदाच तिच्या स्ट्रगलवर भाष्य केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (nia sharma) जवळपास ४ वर्षानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करत आहे. 'सुहागन चुडैल' या मालिकेच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नियाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जवळपास ९ महिने बेरोजगार होते, असं म्हटलं आहे.

अलिकडेच नियाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सुरुवातीच्या काळात तिच्याकडे काम नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर कशा प्रकारे तिला स्ट्रगल करावा लागला हे सुद्धा सांगितलं.

निया पहिल्यांदाच कामासाठी मुंबईत एकटी आली होती. त्यामुळे तिला या शहराविषयी, इंडस्ट्रीविषयी फार काही माहित नव्हतं. इतकंच नाही तर जवळपास ९ महिने ती कामासाठी वणवण भटकत होती. त्यानंतर तिने स्वत:वर आणि कामावर फोकस करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे आताही ४ वर्ष मालिकांपासून दूर गेलेल्या नियाने पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.

'सुहागन चुडैल' या मालिकेत ती अभिनेता जैन इबाद खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी नियाने एक हजारों में मेरी बहना हैं, इश्क में मरजावां. जमाई राजा यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच २०२२ मध्ये ती  'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती.

टॅग्स :निया शर्माटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमुंबई