Join us

Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना करतेय बिग बींच्या नातवाला डेट?, ख्रिसमस पार्टीचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 1:00 PM

Suhana Khan : शाहरुख खानची लाडकी सुहाना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

बॉलिवूडमध्ये स्टार्समधील अफेअरच्या किस्से अनेकदा ऐकायला मिळतात आणि आता या स्टोरीमध्ये एका नव्या कथेची भर पडणार आहे. बॉलिवूडच्या रायझिंग स्टार्सची ही नवीन डेटिंग स्टोरी आहे. त्या स्टार किड्सपैकी ज्यांनी अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले आहे, पण प्रेक्षकांना त्यांना कितपत पसंती मिळते हे अजून पाहायचे आहे. सध्या ज्या डेटिंग आणि अफेअरच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत ते म्हणजे शाहरुख खान(Shah Rukh Khan)ची मुलगी सुहाना खान(Suhana Khan)ची. तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. शाहरुख खानची लाडकी सुहाना अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत असल्याची बातमी आहे.

'द आर्चीज'मधून पदार्पण करणाऱ्या अगस्त्य नंदा आणि सुहाना खान एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदाही नुकत्याच कपूर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत सहभागी झाल्याचे सांगितले जाते. अगस्त्य हा राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा नातू आहे. हिंदुस्तान टाईम्सने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, कपूर कुटुंबाच्या या ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांना सुहानाची जोडीदार म्हणून ओळख करून दिली.

रिपोर्ट्सनुसार, या दोघांमधील नात्याची सुरुवात झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटाच्या सेटवर झाली. सूत्राने सांगितले की ते दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात आणि ते त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, दोघेही सध्या त्यांचे नाते अधिकृत करू इच्छित नाहीत.

प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित बहुतेक लोकांना त्यांच्या बाँडिंगबद्दल माहिती असल्याचेही बोलले जात आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की अगस्त्याची आई श्वेता बच्चनची त्यांच्या नात्याला संमती दिली आहे आणि त्यांना सुहाना खूप आवडते. मात्र, अद्याप त्या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

टॅग्स :सुहाना खानअमिताभ बच्चन