मुंबई - क्रीडा आणि बॉलिवूड सेलिब्रेटीमध्ये असणारं नातं काही नव्याने सांगण्याची गरज नाही. एखादा खेळाडू आणि कलाविश्वात योगदान देणाऱ्या कलाकारांचे जुळणारे सूत या नात्याविषयीच्या चर्चांना हवा देऊन जातात. अशीच एक चर्चा पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना आणि युवा फलंदाज शुभमन गिल यांच्या नात्याची सध्या बरीच चर्चा रंगत आहे.
अंडर-19 च्या विश्वचषक विजेत्या संघात चमकदार कामगिरी केल्यानंतर यावर्षी आयपीएलच्या 11 व्या सत्रात शाहरुख मालक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने शुभमन गिलला करारबद्ध केले होते. त्यानं आपल्या खेळीने अनेकांची मने जिंकली आहेत. आयपीएलनंतर शुभनम आणि सुहानाच्या अफेअर्सची चर्चा रंगली आहे. याबाबत अधिकृत माहिती नसली तरी माध्यमांमध्ये यासंदर्भात बातम्या झळकल्या आहेत.
शुभमन गिल भारताचा सर्वात प्रभावी उदयोनमुख खेळाडू मानला जातो. सुहानासोबत त्याचं नाव जोडलं गेल्यानं या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दोघाना आयपीएलनंतर एकत्र फिरताना पाहण्यात आल्याने या चर्चेला उधान आले आहे.
आयपीएल 11च्या या सत्रात कोलकाता संघाने कार्तिकच्या नेतृत्वात प्लेऑफमध्ये धडक मारली होती.