२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेशने लिहिलं की, "तुझ्यासाठी ख्रिसमस खूप खास आहे. बेबी गर्ल, ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा. माझं प्रेम, आणखी एक सुंदर वर्ष. आपले आत्मे एकमेकांशी जोडलेले आहेत. तुला ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना, मी तुझे हात माझ्या हातात घेऊन, तुझ्या डोळ्यांत पाहून शुभेच्छा देतोय हे फील करतोय."
"आज मी तुला वाईनच्या बॉटलने आश्चर्यचकित करणार नाही, मी तुला प्रेमाचा देश असलेल्या 'फ्रान्स'मधील एक द्राक्ष बाग भेट देत आहे. बेबी, तुझा सांता आज तुझी इच्छा प्रत्यक्षात पूर्ण करत आहे. तुझं ख्रिसमस गिफ्ट जे मी तुला आज देत आहे ती १०७ वर्षे द्राक्ष बाग आहे, ज्यामध्ये एक सुंदर टस्कन शैली असलेलं घर आहे, हे तुझ्यासाठी ख्रिसमसं सर्वोत्तम गिफ्ट आहे. मला विश्वास आहे तुला ते नक्की आवडेल."
सुकेशने पुढे लिहिलं, "बेबी गर्ल, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं ख्रिसमस गिफ्ट आहेस. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाची जागा कधीही कोणीच घेऊ शकत नाही. बेबी, या सुंदर प्रसंगी तुझ्याशिवाय, फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी आपलं प्रेमच आहे. जे प्रेम मला मजबूत ठेवतं. द्राक्ष बागेचं नाव बदलून 'द वाईन ऑफ लव्ह' असं ठेवण्यात आलं आहे."
"बेबी, मला आशा आहे की, तुला ख्रिसमस गिफ्ट आवडेल. मी तुझा हात धरून द्राक्षमळ्यात फिरण्यासाठी बेचैन आहे. जगाला वाटेल की मी वेडा आहे. हो मी तुझ्या प्रेमात वेडा आहे यात शंका नाही. मी बाहेर येईपर्यंत तू वाट बघ. जग आपल्याला एकत्र पाहेल. बेबी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझी खूप आठवण येत आहे" असं सुकेशने पत्रात म्हटलं आहे.