स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. याच मालिकेत देवकीची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod)ने साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. मीनाक्षीने नुकतेच गोंडस कन्येला जन्म दिला आहे. तिने तिचे फोटोशूटदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आता लेकीचा बारसा पार पडला आहे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिच्या लेकीचं नावदेखील समोर आले आहे.
मीनाक्षी राठोड हिने इंस्टाग्रामवर बारशाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, असं म्हणतात … नावात काय ठेवलंय? पण आयुष्यभर आपली ओळख ज्या नावाने होते ते नाव तर ठेवावेच लागेल! होय! नाव ठरलंय! मीनाक्षीच्या बाळाचा बारसा १४ ऑगस्टला पार पडला. बारशाचा व्हिडीओ समोर आला असला तरी तिचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. मात्र आता बाळाचे नाव समोर आले आहे.
मीनाक्षी राठोड हिने बारशाचा व्हिडीओ शेअर करत मला यारा या नावाने हाक मारा असे लिहिले आहे. तिने व्हिडीओसोबत बाळासोबतचे फोटो देखील शेअर केले आहेत. यारा हे नाव चाहत्यांच्या पसंतीस पडले असून ते कौतुक करताना दिसत आहेत.
मीनाक्षीच्या पतीचे नाव कैलास वाघमारे असून त्याने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. कैलास अजय देवगणच्या ‘तानाजी द अनसंग वारियर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते. मीनाक्षी आणि कैलास हे एकाच चित्रपटात देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची निर्मिती कैलास वाघमारे हा करतो आहे.