छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata). गेल्या कित्येक दिवसांपासून शिर्केपाटील कुटुंबात अनेक उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळात होतं. शिर्केपाटील कुटुंबात आतापर्यंत सून म्हणून राहणारी गौरी या घराची लेक असल्याचं सत्य समोर आलं आहे तेव्हापासून जयदीप स्वतःला शिर्के पाटलांच्या घरात वेगळं समजत आहे. शालिनी त्याला या गोष्टीची जाणीव वारंवार करुन देतेय आहे. या सगळ्याचा परिणाम गौरी आणि जयदीपच्या नात्यावरही होत आहे. दरम्यान मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये जयदीप आणि गौरी शिर्के पाटलांचं घर सोडून जात असतात. माई त्यांना आडवतात आणि त्यांना घर सोडून जाण्यामागचं कारण विचारतात.
गौरी दारातच चक्कर येऊन खाली पडते. डॉक्टरांना बोलवलं जात. गौरीला तपासून डॉक्टर ती प्रेग्नेंट असल्याचे सांगतात. त्यामुळे शिर्के पाटील कुटुंबीय सध्या आनंदात आहेत. येणाऱ्या काळात मालिकेत एक पॉझिटिव्ह ट्रॅक बघायला मिळणार आहे. ही आनंदाची बातमी समजल्यावर जयदीप आता शिर्के पाटलांचं घर सोडणार की गौरीला घेऊन तिथेच राहणार. शालिनी आता गौरी आणि जयदीप विरोधात कोणता नवा कट रचणार?, हे आपल्याला लवकरच कळेल.