सुमीत राघवनच्या या नव्या मित्राचा फोटो तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 08:00 AM2018-11-24T08:00:00+5:302018-11-24T08:00:02+5:30
सुमीतने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण भेटा माझ्या नव्या मित्राला... अशी या फोटोसोबत सुमीतने कॅप्शन दिली आहे.
'महाभारत', 'तू तू मैं मैं', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' यांसारख्या मालिकांमध्ये सुमीत राघवनने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्याने एक कसदार अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमीतने मराठी, हिंदी चित्रपट, मालिका यांमध्ये आजवर दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्याचा 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. या चित्रपटात तो ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉ. श्रीराम लागू यांसारख्या दिग्गजाची भूमिका साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. पण सुमीतने त्याच्या अभिनयाने ही भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारली आहे. सुमीतच्या या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
सुमीत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी इंडस्ट्रीत काम करत आहे. त्याने साकारलेल्या दर्जेदार भूमिकांमुळे त्याचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. आपला आवडता अभिनेता खऱ्या आयुष्यात कसा आहे, त्याला कुठे फिरायला आवडते हे जाणून घ्यायची इच्छा चाहत्यांना प्रचंड असते आणि त्यामुळे ते त्यांना मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. सुमीतचे देखील फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असल्याने त्याला अनेक लाखांहून लोक इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर फॉलो करतात आणि तो देखील त्याच्या चाहत्यांसाठी त्याचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याच्या आगामी चित्रपट, नाटकांविषयी त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. पण त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण भेटा माझ्या नव्या मित्राला... अशी या फोटोसोबत सुमीतने कॅप्शन दिली आहे. हा मित्र म्हणजे दुसरा कोणी नसून एक क्यूट पपी आहे. याचे नाव व्यंकू असल्याचे सुमीतने या पोस्टद्वारे सांगितले आहे.
सुमीतने त्याच्या आणि त्याच्या या लाडक्या मित्राचा सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यापासून अनेकांनी या फोटोला लाइक केले आहे. तसेच सुमीतचा हा नवा मित्र खूपच गोड असल्याचे प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे.