‘लागी तुझसे लगन’ या मालिकेत ‘सुदर्शन’ या नकारात्मक पात्राची भूमिका प्रभावीपणे बजावल्यानंतर अभिनेता सुमित कौल लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अशोका’ या शाही थाटाच्या मालिकेत पुन्हा एकदा ‘जस्टिन’ हे काहीसे नकारात्मक पण स्वत:च्या हक्कासाठी लढा देणारे पात्र साकारणार आहे. मालिकांतील नकारात्मक भूमिकांसाठी सुमित कौलने ‘ग्लॅडीएटर’ चित्रपटातील कोमोडन चारोल आणि बॉलीवूडमधील अभिनेता प्राण यांचा आदर्श घेतला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना नकारात्मक भूमिकांच्या प्रेमात पडायला भाग पाडणाऱ्या सुमितच्या मते कोणतेही पात्र हे कधीच नकारात्मक नसून ते दिशाहीन असते. त्यामुळे या नव्या भूमिकेतून सुमित पुन्हा एकदा नकारघंटा वाजवताना दिसणार आहे यात शंकाच नाही.