‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharli ) या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेतील लतिका आणि अभ्याची जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. सध्या ही मालिका एका वेगळ्यारंजक वळणावर आलेली पाहायला मिळतेय. पण अशात मालिकेतील नंदिनीनं ही मालिका सोडली आहे. तिने मालिका सोडण्यामागचं कारणही समोर आलं आहे. होय, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविडने तिचा ट्रॅक संपल्यामुळे मालिकेचा निरोप घेतला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती दिली.
आदितीची पोस्ट...नंदिनीचा प्रवास 27 ऑगस्टला सुरू झाला होता आणि खरं तर ती फक्त 2 महिन्यांसाठी आली होती. पण बघता बघता 2 चे 6 महिने कधी झाले कळलंच नाही आणि हे केवळ तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच शक्य झालं. नंदिनीला ऑफिशिअली बाय बाय म्हणायचं राहिलं होतं. म्हणून ही पोस्ट करतेय,’ असं आदितीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या सर्व टीमचे आभारही मानले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आम्ही तुला मिस करू..., तुला अजून पाहायला आवडलं असतं, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
याआधी आदितीने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तुम्ही पाहिलं असेलच. या मालिकेत तिने शनायाची मैत्रीण इशाची भूमिका केली होती. याशिवाय डॉ. बाबासाहेब यांच्या मालिकेत त्यांची थोरली बहीण तुळसा हिची भूमिकाही तिने साकारली होती. अनेक कलाकारांनी सोडली मालिकागेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सोडली आहे. अभ्याच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रणिती नरकेने सोडली आहे. दौलतच्या आबाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील ही मालिका सोडली. लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणारी गौरी किरण हिने मालिका सोडलेली आहे. अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने देखील मालिकेतून निरोप घेतला आहे.