आपल्या दमदार आवाजाने संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या फिमेल सिंगर्सच्या यादीत सुनिधि चौहानचे नाव अग्रस्थानी येते. सुनिधीने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरली आहेत. बॉलिवूडसोबत तिने अनेक मराठी गाणी देखील गायिली आहेत. एकदा काय झालं या सिनेमाच्या निमित्ताने सुनिधीने पहिल्यांदा मराठीत अंगाई गायली आहे. त्याची झलक या सिनेमातील अभिनेत्री ऊर्मिला कोठारेने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ऊर्मिलाने ही अंगाई शेअर करताना एक पोस्ट देखील लिहिली आहे. अंगाई नुसतं गाणं नसतं... ती आईच्या हृदयाची स्पंदनं असतात... आईने प्रेमाने, मायेने गायलेली अंगाई ही कोणत्याही वयातील मुलाला/मुलीला कायमच हवीहवीशी वाटते... अशीच सुंदर अंगाई प्रसिद्ध गायिका सुनिधि चौहान यांनी ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटासाठी गायली आहे. सुनिधि यांनी गायलेली ही पहिली मराठी अंगाई आहे... नक्की ऐका!
एकदा काय झालं सिनेमात ऊर्मिला चिंतनच्या आईची भूमिका साकारते आहे. सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन केलं आहे. ऊर्मिला सह यात सुमीत राघवन, पुष्कर श्रोत्री आणि बालकलाकार भूमिका अर्जुन पुर्णपात्रेने साकारली आहे.. ५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.