Suniel Shetty : बॉलिवूडचा अण्णा म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टीसिनेमांमधून गायब आहे. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांना वेड लावले होते. मात्र काही काळानंतर तो मोजक्याच सिनेमांमध्ये दिसायला लागला. सिनेमांमध्ये काम करणे बंद का केले असे सुनील शेट्टीला विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, प्रेक्षक आता कचऱ्यावर पैसे खर्च करत नाहीत.
एका मुलाखतीत सुनील शेट्टीने बॉलिलूडचा सध्या सुरु असलेला वाईट काळ आणि त्याची कारणं यावर चर्चा केली. सुनील शेट्टी म्हणाला, 'आजकाल प्रेक्षक कचऱ्यासाठी पैसे खर्च करत नाहीत. यामुळेच बॉलिवूडचा सध्या वाईट काळ सुरु आहे. माझी मुलं मला विचारतात की मी आता सिनेमा का करत नाही. यावर मी त्यांना हेच सांगतो की मी आजवर अनेक चुका केल्या आहेत आणि आता प्रेक्षक त्या कचऱ्याला बघण्यासाठी खर्च करायला तयार नाहीत.'
तो पुढे म्हणाला, 'अर्थशास्त्र कसे चालते हे बॉलिवूडने समजून घेण्याची गरज आहे. ९० च्या दशकातील चित्रपट आणि आत्ताचे चित्रपट यात खूप अंतर आहे. आधी कलाकारांना असे जज केले जात नव्हते. पण आज कलाकारांना जास्त जज केले जाते. '
90 टक्के bollywood ड्रग्स घेत नाही, 'बॉयकॉट' टॅग दूर करा; सुनील शेट्टीची योगींकडे मागणी
सुनील शेट्टीने नुकतेच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड दूर करावा अशी विनंती त्याने योगींना केली होती. सुनील शेट्टी नुकताच 'धारावी बॅंक' या सिरीज मध्ये दिसला होता. तर लवकरच तो हेरा फेरी ३ मध्येही दिसणार आहे.