सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि त्याची पत्नी माना शेट्टी (Mana Shetty) यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. या दिवशी दोघे एकत्र आले होते. आज ते आपल्या लग्नाचा 30 वा वाढदिवस (Suniel Shetty-Mana Shetty 30th weeding anniversary) साजरा करत आहेत. या निमित्ताने सुनील शेट्टी (Suniel Shettyने पत्नी माना शेट्टी (Mana Shetty) सोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'तेव्हा सुंदर...अजूनही सुंदर...सदैव सुंदर...हॅपी ३०व्या अॅनिव्हर्सरी वाईफ'. आज या निमित्ताने आम्ही त्यांची लव्हस्टोरी सांगणार आहोत.
सुनील शेट्टी आणि मानाची लव्हस्टोरी एक पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती. येथे सुनीलने पहिल्यांदा मानाला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मानाच्या जवळ जाण्यासाठी सुनीलने सर्वप्रथम मानाच्या बहिणीला मैत्रीण बनवले. मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली आणि सुनीलने अगदी फिल्मी स्टाइलने मानाला प्रपोज केले होते. मानानेसुध्दा लगेच होकार दिला. सुनील शेट्टीची पत्नी माना मुस्लिम असून तिचे खरे नाव मोनिशी कादरी आहे. दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते,पण दोघांनी हार मानली नाही. तब्बल 9 वर्ष त्यांनी प्रतीक्षा केली, 9 वर्षे म्हणजे 3285 दिवस दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. ठरवलं की काहीही झालं तरी ते एकमेकांची साथ सोडणार नाहीत. 1991मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना मुलगी अथिया आणि मुलगा अहान आहेत.
बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत स्टार्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे.