Join us

'येत्या काही महिन्यात...'; अथियाच्या लग्नावर भावाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:22 IST

Ahan Shetty: अथिया आणि केएल राहुल नेमकी कधी लग्नगाठ बांधणार हा एकच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरं अहानने दिलं आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईचे वारे वाहात आहेत. त्यामुळेच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्यानंतर अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अलिकडेच या लग्नावर अथियाचे वडील अर्थात अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता अथियाचा भाऊ अभिनेता अहान शेट्टीने(Ahan Shetty)  एक महत्त्वाचा संकेत दिला आहे.

अथिया आणि केएल राहुल नेमकी कधी लग्नगाठ बांधणार हा एकच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरं अहानने दिलं आहे. एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या तारखेविषयी भाष्य केलं आहे.

"अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाविषयी अद्याप आम्ही काहीही ठरवलं नाही. या लग्नाची तयारीदेखील आमच्याकडे सुरु झालेली नाही. तसंच लग्नापूर्वीचे कोणतेही विधीही झालेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत. आणि, अजून लग्न ठरलंच नाहीये तर या लग्नाचे मी काय डिटेल्स देऊ?", असं अहान म्हणाला.

पुढे तो म्हणाला, "सध्या तरी या लग्नाचं काही प्लॅनिंग नाहीये. तसंच येत्या काही काळातही लग्न करण्याविषयी आमची काहीही योजना नाही."

दरम्यान, अहानपूर्वी सुनिल शेट्टीने एका मुलाखतीत अथियाच्या लग्नावर भाष्य केलं होतं. यावेळी तो प्रचंड भावुक झाला होता. यावेळी आम्ही लग्नाची तयारी सुरु केली असून हॉटेल, कॅटरर्स, डिझायनर सगळं काही बूक झाल्याचंही त्याने सांगितलं होतं. मात्र, आता अहानने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

टॅग्स :अहान शेट्टीअथिया शेट्टी बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा