अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याच्या बॉलिवूड डेब्यूचा मुहूर्त अखेर ठरलाय. होय, अहान शेट्टी दीर्घकाळापासून या डेब्यूसाठी तयारी करत होता. आज त्याच्या डेब्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श याने ट्विटरवर अहानच्या डेब्यूवर शिक्कामोर्तब केले. 'IT'S OFFICIAL... Sajid Nadiadwala ropes in director Milan Luthria for Ahan Shetty’s debut... An official remake of #Telugu hit #RX100.'असे ट्विट त्याने केले. त्याच्या या ट्विटसोबतचं अहान ‘आरएक्स 100’ मधून डेब्यू करणार, हे निश्चित झाले.
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू ठरला! या रिमेकमधून घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:44 IST
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याच्या बॉलिवूड डेब्यूचा मुहूर्त अखेर ठरलाय. होय, अहान शेट्टी दीर्घकाळापासून या डेब्यूसाठी तयारी करत होता. आज त्याच्या डेब्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू ठरला! या रिमेकमधून घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!
ठळक मुद्देनिर्माता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.तूर्तास अहान शेट्टी त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहेत. अहान हा कथितरित्या तानिया श्रॉफला डेट करतोय.