Join us

दस का दम या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सुनील ग्रोव्हर दिसणार या सुपरस्टारच्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 08:00 IST

दस का दमच्या दमदार फिनालेच्या या वीकएंडच्या भागात सलमान खान, राणी मुखर्जी आणि एसआरके यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे.

सलमान खानचादस का दम हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. पण या सिझनला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने या कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा दमदार असणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना पाहायला मिळणार आहे. ते दोघे मिळून या कार्यक्रमात खूप मजा मस्ती करणार आहेत.

शाहरुख खान, सलमान खान आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला कुछ कुछ होता है हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या वेळेच्या अनेक आठवणी या तिघांनी दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांना सांगितल्या. दस का दम या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.

दस का दमच्या दमदार फिनालेच्या या वीकएंडच्या भागात सलमान खान, राणी मुखर्जी आणि एसआरके यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या अवतरात आणि सर्वांच्या लाडक्या रिंकू भाभीच्या रूपात या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात तो दिसणार आहे. स्वतः अमिताभ बच्चन असल्याचा दावा करत तो या तिन्ही सुपरस्टार्ससोबत कौन बनेगा करोडपतीचा गंमतीशीर खेळ खेळणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या अंदाजात तो उपस्थितांसोबत गप्पा मारणार आहे. तो अमिताभ यांच्यासारखा आवाज काढून म्हणणार आहे की , “सलमान साहब और शाहरुख साहब, जोरदार तालीयां मेरे लिये, क्योंकी मैं यहाँ आया हूँ! बहुत बहुत धन्यवाद, आभार आपका कि आपने मुझे नहीं बुलाया पर मैं फिर भी यहाँ आ गया!” तो पुढे असेही म्हणणार आहे की, “देवियों और सज्जनों, जैसे ये दिल में आते हैं, समझ में नहीं; उसी तरह मैं फ़िनाले में आता हूँ, एपिसोड में नहीं!”

टॅग्स :दस का दमशाहरुख खानसलमान खानराणी मुखर्जीसुनील ग्रोव्हर