Join us

बाबो! सुनील शेट्टींपेक्षा जास्त श्रीमंत आहे त्याची बायको, आहे इतक्या कोटींची मालकीण, दिसतेही खूपच संदर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 4:34 PM

सुनिल शेट्टी  (Suniel Shetty)ची बायको त्याच्यापेक्षाही जास्त श्रींमत आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून तिला दूरच राहणे आवडते.

बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत स्टार्समध्ये सुनील शेट्टी (Suniel Shetty)चे  नाव घेतले जाते. सुनील  (Suniel Shetty)ने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. आज सुनील (Suniel Shetty)कडे एक-दोन नसून अनेक रेस्टॉरंट्स आणि जिमचा व्यवसाय आहे. त्यामुळे तो पैशासांठी सिनेमांंवर अजिबात अवलंबून नाही. इतके नाही तर सुनिल शेट्टी  (Suniel Shetty)ची बायको त्याच्यापेक्षाही जास्त श्रींमत आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून तिला दूरच राहणे आवडते. म्हणूनच बॉलिवूडमधील एक गोड दाम्पत्य म्हणून या दोघांना ओळखलं जातं. आज त्यांच्या लग्नाला 30 वा वाढदिवस आहे. 

दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. त्यांचे एकत्र फोटो पाहून त्याच्यातलं हे नातं अधिक घट्ट असल्याचे जाणवतं. दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. कामातून वेळ काढत दोघेही सुट्ट्यांचा आनंद घेत एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतात. त्यांचे व्हॅकेशन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच रसिकांची तुफान पसंती मिळते.

सुनील शेट्टी यांच्या पत्नीचे नाव ‘मान शेट्टी’ आहे मान ही एक व्यवसायिक महिला असून समाजसेविकाही आहे. खाजगी आणि व्यावसायिक एकाच वेळी अेक जबाबदा-या ती सांभळते. उत्तम डिझायनर आहे आणि तिच्या बहिणीसह ‘मान एन्ड ईशा’ नावाचा स्वत: चे कपड्यांचा ब्रँडची ती मालकीण आहे.

सुनिल शेट्टी नेहमीच त्याच्या यशामागेच एक स्त्री आहे असे सांगत नाही. दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, माझ्या यशामागे पाच स्त्रिया असून त्यांच्यामुळे मी यश मिळवू शकलो. माझ्या आईने लहानपणापासून मी मोठा होईपर्यंत अक्षरक्षः हात पकडून मला प्रत्येक गोष्ट शिकवली. माझ्या बहिणी नेहमीच प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठिशी उभ्या असतात. माझ्या बायकोने मला आयुष्यात नेहमीच साथ दिली.

माझे चित्रपट चालले नाहीत, तरी ती मला काम करायला प्रोत्साहन द्यायची. मुलीच्या जन्मानंतर तर आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. आज मला सत्य-असत्यमधील फरक सांगणारी केवळ तीच आहे. या सगळ्या स्त्रियांचा माझ्या यशामागेच नव्हे तर माझ्या खूश असण्यामागे हात आहे. प्रत्येक यशस्वी नव्हे तर आनंदी व्यक्तीच्यामागे महिलांचा हात असतो असे मला तरी वाटते.

टॅग्स :सुनील शेट्टी