अभिनेता सनी देओल(Sunny Deol)ने आगामी चित्रपट 'बॉर्डर २' (Border 2) ची नुकतीच घोषणा केली आहे. सनी देओलचा गदर २ रिलीज झाल्यानंतर त्याचा बॉर्डर २ चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता. अखेर आता चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच एकीकडे सनी लाहौर १९४७चं शूटिंग करत आहे. तर दुसरीकडे बॉर्डर २ ची घोषणा झाल्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करताच चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
१९९७साली रिलीज झालेल्या सनी देओलच्या बॉर्डरचा सीक्वल बॉर्डर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमधून सनी देओल कमबॅक करतो आहे. तब्बल २७ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल येतो आहे.
सनी देओलने बॉर्डर २ ची घोषणा करत व्हिडीओ शेअर केला आहे. यात सनीचा आवाज ऐकू येत असून तो म्हणत आहे की, २७ वर्षांपूर्वी एका फौजीने वचन दिले होते. तेच वचन पूर्ण करण्यासाठी आणि हिंदुस्तानाच्या मातीला सलाम करण्यासाठी येतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत. या चित्रपचाती निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत.