अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) नुकताच लग्नबंधनात अडकला. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, सलमान खान आणि आमिर खानसह अनेक कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. यामध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) मात्र दिसला नाही. शाहरुख आणि सनी देओलने 'डर' (Darr) या सिनेमात एकत्र काम केले होते. तेव्हा हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण तेव्हापासून सनी आणि शाहरुख यांच्यात वादही झाले होते असं म्हणतात.
जुना वाद पुन्हा ताजा झाला
करण देओलच्या लग्नानंतर एका खास पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बॉलिवूड कलाकार सामील झाले. यात सलमान, आमिर या दोन दिग्गज खानांनी हजेरी लावली. पण किंग खान कुठेच दिसला नाही. मग सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली की कदाचित सनी देओलने शाहरुखला बोलावलेच नाही. याचं कारण म्हणजे त्यांच्यातील बऱ्याच वर्षांआधीचा वाद.
1993 मध्ये शाहरुख आणि सनी देओलने एकत्र काम केले. यावेळी असं काही झालं की सनी देओल शाहरुखवर नाराज झाला. यासोबतच सनीने शाहरुख आणि यश चोप्रासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला. अनेक मुलाखतीत सनीने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. सनीने त्यावेळी अनेकदा हे सांगायचा प्रयत्न केला की फिल्ममध्ये तो कमांडो बनला आहे. त्याची भूमिका एक्सपर्ट आणि फिट आहे. हा मुलगा मला सहज कसा मारु शकतो. मग मला कमांडो कसं म्हणणार. सनी म्हणाला, 'यश चोप्रा यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मला कळलंच नाही की रागारागात कधी मी माझी पँट फाडली.'
या घटनेला १६ वर्ष झाली तरी अजूनही सनी देओल शाहरुखसोबत बोलला नाही. जाणूनबुजून नाही तर त्याने स्वत:ला वेगळं केलं फारसं सोशलाईज केलं नाही. सनी कोणत्याही इव्हेंटला जात नाही त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच येत नाही. माध्यम रिपोर्ट्सनुसार, सुभाष घई यांनी सनी आणि शाहरुखची भेट घडवून आणली होती. तेव्हा दोघांनी एकमेकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधला होता.