Join us

Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 10:54 AM

Gadar 2 : अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत.

अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत. ‘गदर 2’मध्ये (Gadar 2) सनी देओल (SunnyDeol) पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत आहे. तर अमिषा सकिनाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

शाहरूखच्या पठाण या चित्रपटात पाकिस्तानी जनरल कादिरची भूमिका साकारणारा अभिनेता मनीष वाधवा या चित्रपटात विलन साकारणार आहे. आता या चित्रपटाची कथा काय असणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तर चित्रपटाची कथा देशाच्या फाळणीनंतरच्या 24 वर्षांनंतरची आहे. यात पाकिस्तानी सैन्याविरूद्धचं युद्धही दिसणार आहे. तारा सिंग अर्थात सनी देओलच्या मुलाच्या कथेपासून चित्रपट पुढे सरकणार आहे. ‘गदर 2’मध्ये निगेटीव्ह भूमिका साकारणारे मनीष वाधवा यांनी भास्करला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचा संपूर्ण प्लॉट सांगितला.

 ‘गदर 2’ची कथा मुळात प्रेमकथाच आहे. मात्र यावेळी तारा सिंगच्या मुलाची म्हणजेच चरणजीत सिंगची प्रेमकथा यात पाहायला मिळणार आहे. चरणजीतचं प्रेम पाकिस्तानात आहे. मुलाच्या प्रेमाणासाठी चरणजीत व तारा सिंग पाकिस्तानात पोहोचतात. आता तारासिंग आपल्या मुलाला त्याचं प्रेम मिळवून देऊ शकतो की नाही, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तारा सिंगच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने साकारली आहे. त्याचेही ॲक्शन सीन्स चित्रपटात बघायला मिळणार आहेत. पाकिस्तानच्या आर्मी जनरलच्या सैन्यासोबत त्याचे ॲक्शन सीन्स चित्रपटात आहेत. टीनू वर्मा आणि साऊथच्या रवी वर्माच्या मदतीने ॲक्शन सीन्स साकारण्यात आले आहेत. याशिवाय विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनीही ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान दिलं आहे.

लखनौ आणि महाराष्ट्रातील अहमदनगर येथे पाकिस्तानचा सेटवर तयार करण्यात आला होता. यासाठी लखनौत 50दिवसांचं शूट झालं तर अहमदनगर येथे 25 दिवस शूटींग झालं. ‘गदर’मध्ये अमरिश पुरी यांनी अशरफ अलीची यादगार भूमिका साकारली होती. अमरिश पुरी या जगात नाहीत. ‘गदर 2’मध्ये त्यांचा रोल रिप्लेस न करता अशरफ अली हे पात्रच काढून टाकण्यात आलं आहे.  अमिषा पटेल, सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट, 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलबॉलिवूड