बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्यांचं खाजगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं. अगदी कमी वयात त्यांचं प्रकाश कौरशी (Prakash Kaur) लग्न झालं. त्यांना पहिल्या लग्नापासून सनी देओल (Sunny Deol) बॉबी देओल (Bobby Deol) ही दोन मुलं आहेत हे तर सगळ्यांनाच माहित आहे. सनी आणि बॉबी दोघांनीही वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सिनेसृष्टी गाजवली. पण या भावांना दोन सख्ख्या बहिणीही आहेत बरं का!
सनी देओल आणि प्रकाश कौर यांना विजेता (Vijeta Deol) आणि अजिता (Ajieta Deol) अशा दोन मुली देखील आहेत. मात्र या दोघीही मुली कायमच लाईमलाईटपासून दूर राहिल्या. वडील आणि भावांप्रमाणे दोन्ही मुलींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण न करता वेगळा रस्ता निवडला. दोघीचं लग्न झालं असून त्यांच्या संसारात रमल्या आहेत. विजेता आणि अजिता नेमक्या काय करतात आणि कुठे असतात याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
तर विजेता देओल हिला लिली असंही म्हणतात. धर्मेंद्र यांच्या प्रोडक्शन कंपनीचं नाव 'विजेता प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड' असंच आहे. विजेताचं विवेक गिलसह लग्न झालं आहे. त्यांना साहिल आणि प्रेरणा ही दोन मुलं आहेत. माध्यम रिपोर्टनुसार विजेता कुटुंबासह दिल्लीत राहते.ती कधीही प्रसिद्धी माध्यमांसमोर येत नाही. ती आज रामकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडची डायरेक्टर आहे.
धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी अजिता देओल खूपच सुंदर आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को मधील एका शाळेत ती मानसशास्त्राची शिक्षिका आहे. तिला सगळे प्रेमाने डॉली म्हणतात. अजिताने डेंटिस्ट किरण चौधरी यांच्याशी लग्न केलं आहे. लग्नानंतर ती कायमची अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांना निकिता आणि प्रियंका चौधरी या दोन मुली आहेत. अजिताही बहीण आणि आईप्रमाणेच लाईमलाईटपासून दूर आहे.
धर्मेंद्र यांचं वयाच्या १९ व्या वर्षीच प्रकाश कौर यांच्याशी अरेंज मॅरेज झालं होतं. यानंतर ते मुंबईत आले आणि ६० च्या दशकात सिल्व्हर स्क्रीनवर दमदार पदार्पण केले. तर प्रकाश कौर यांना मुलांना सांभाळलं. मात्र अचानक धर्मेंद्र यांच्या आयुष्यात हेमा मालिनी यांची एंट्री झाली तेव्हा प्रकाश कौर यांना धक्काच बसला. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. त्यांना आधीच चार मुलं होती. यानंतप धर्मेंद्र यांना हेमा मालिनीपासून ईशा आणि आहाना या दोन मुली झाल्या.