Join us

'लॉर्ड बॉबी' चा 'तो' सीन न पाहताच थिएटरबाहेर गेला सनी देओल, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 8:45 AM

सनी देओलने सिनेमावर प्रतिक्रिया देताना असेही सांगितले होते की,...

गेल्या वर्षातला गाजलेला सर्वात सुपरहिट सिनेमा तो म्हणजे Animal. सिनेमबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी बॉक्सऑफिसवर चित्रपटाने बक्कळ कमाई केली. रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) कधीही न बघितलेला अवतार यामध्ये पाहायला मिळाला. तर बॉबी देओलही (Bobby Deol) काही वेळासाठी येत भाव खाऊन गेला. रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा तो सीन पाहण्याआधीच सनी देओल (Sunny Deol) थिएटरमधून बाहेर पडल्याचा किस्सा आहे. नेमका कोणता आहे तो सीन?

Animal सिनेमात बॉबी देओल मुख्य खलनायक आहे. मध्यंतरनंतर त्याची भूमिका आहे. त्याने अबरार ही भूमिका साकारली आहे. भावाच्या सिनेमाविषयी सनी देओल म्हणाला, 'अॅनिमल हा चांगला सिनेमा आहे. पण मी जेव्हा सिनेमा पाहत होतो तेव्हा एका सीनवेळी मी सीटवरुन उठून थिएटरबाहेर गेलो. क्लायमॅक्स सीनमध्ये मी माझ्या भावाला मार खाताना पाहू शकत नव्हतो. या सीनबद्दल मी फार बोलूही शकत नाही.'

शिवाय सनी देओलने सिनेमावर प्रतिक्रिया देताना असेही सांगितले होते की,'यातील बऱ्याच गोष्टी खटकल्या. पण त्या प्रत्येक सिनेमात असतातच.माझ्याही सिनेमात असतात त्यामुळे काही पर्याय नाही.'

2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूपच खास ठरलं. सनी देओलच्या 'गदर 2'ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचं हे यश पाहून बॉलिवूडमधील इतर कलाकारही बघतच राहिले. तर दुसरीकडे बॉबी देओलही 'आश्रम' सिरीजमुळे चर्चेत होता. यानंतर Animal मुळे त्याला 'लॉर्ड बॉबी' ही ओळख दिली.

टॅग्स :सनी देओलबॉबी देओलरणबीर कपूरसिनेमा