बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या करियरची सुरूवात पॉर्न स्टार म्हणून केली होती. यात ती टॉप एडल्ट स्टार बनली होती. मात्र जेव्हा तिने स्वतः पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिली होती. तेव्हा तिला खूप पश्चाताप वाटला होता.
सनी लिओनीची वेबसीरिज करनजीत: द अनटोल्ड स्टोरीमध्ये हा किस्सा सांगण्यात आला आहे. या वेबसीरिजनुसार सनीने पहिल्यांदा पॉर्न फिल्म तिचा भाऊ आणि एका मित्रासोबत चुकून पाहिली होती. ही फिल्म पाहिल्यानंतर तिला खूप पश्चाताप झाला होता. इतकेच नाही तर तिला चक्करसारखं झालं होतं. ती गुरू नानक देवाच्या फोटोसमोर उभी राहून तिच्या चुकीची माफी मागितली होती. सनीचे जीवन व तिचे अनुभव आतापर्यंत कोणाला माहित नव्हते. मात्र करनजीत: द अनटोल्ड या वेबसीरिजमधून तिच्या जीवनातील किस्से सर्वांसमोर आले आहेत. तिचा आणखीन एक किस्सा समोर आला आहे की, सनीचा भाऊ पोस्टर्सवर सनीचा ऑटोग्राफ घेऊन कॉलेजमध्ये विकायचा.
अॅडल्ड फिल्ममध्ये एन्ट्री करताना तिला नवीन नाव हवे होते. त्यावेळी सर्वात आधी तिच्या डोक्यात भाऊ संदीपचे निकनेम सनी आलं.
अशाप्रकारे तिने आपल्या भावाचं नाव सनी स्वतःला ठेवलं.