Join us

सनी लिऑनला योग्य तो मान द्यायला हवा - कतरिना कैफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 5:54 PM

प्रत्येक व्यक्तिला मग ती कुणीही असो योग्य तो मान द्यायला हवा. कुणी कलाकार असतो, कुणी पत्रकार असतो, कुणी आणखी काही वेगळं काम करतो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - प्रत्येक व्यक्तिला मग ती कुणीही असो योग्य तो मान द्यायला हवा. कुणी कलाकार असतो, कुणी पत्रकार असतो, कुणी आणखी काही वेगळं काम करतो, अशा कामांमध्ये भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तिला मान द्यायला हवा, तिचा आदर करायला हवा असं मत कतरिना कैफनं व्यक्त केलं आहे. सनी लिऑनला, नुकतंच एका वृत्तवाहिनीवर अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तर राखी सावंत सारखे अनेक जण तिच्या भूतकाळावरून गरळ ओकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सनी लिऑनबद्दल लोकमतशी बोलताना कतरिनानं वरील मत व्यक्त केलं आहे.
फितूर हा कतरिना व आदित्य रॉय कपूरचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असून त्या निमित्तानं तिनं लोकमतशी गप्पा मारल्या.
चार्ल्स डिकन्स यांच्या ग्रेट एक्स्पेक्टेशन्स या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा असून कतरिनाच्या सांगण्यानुसार ही एक सर्वोत्कृष्ट प्रणयकथांपैकी एक आहे.
 
 
 लग्न करायचं म्हटलं, कुटुंबाची, समाजाची इतकी बंधनं असतात की त्या ओझ्याखाली प्रेमी जीव दबून जातात या वास्तवावर आधारीत हा सिनेमा असल्याचं आदित्यनं सांगितलं.
 
एका चित्रकाराची भूमिका या चित्रपटात रंगवत असलेल्या आदित्यनं वजन कमी करणं, क्लासेस लावून चित्रकलेचा गाभा शिकणं, काश्मिरमध्ये राहून तिथली जीवनशैली शिकणं असे भरपूर परीश्रम घेतले आहेत.
विशेष म्हणजे डिकन्सचं ग्रेट एक्स्पेक्टेशन्स हे मूळ पुस्तक कतरिनानं वाचलं तर या पुस्तकावर बेतलेला हॉलीवूडपट आदित्यनं बघितलाय. आपापल्या परीनं या चित्रपटासाठी मेहनत घेणा-या या दोन कलाकारांना व्हॅलेंटाइन दिनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रणयपट चालेल अशी अपेक्षा आहे.