बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सिनेमांच सिक्वल पाहायला मिळाले आहेत. सिक्वलच्या याच यादीत आता आणखीन एका सिनेमाची एंट्री झाली आहे. हा सिनेमा आहे 'सुपर 30'. या सिनेमाचा पहिला भाग सुपरहिट ठरला. सिनेमाला समीक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. रसिकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई करत सिनेमा सुपरहिट ठरला. विशेष म्हणजे सिनेमाला माऊथ पब्लिसिटीचा खूपच चांगला फायदा झाला.
सिनेमाला मिळालेले यशामुळेच निर्मात्यांनी सिनेमाचा सिक्वल आणायचा निर्णय घेतला आहे. सिक्वेलची तयारी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा लवकरच चीनमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमातून 'जुगराफिया' हे प्रेमगीत चीनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या आवृत्तीमधून काढले जाणार असून. त्याव्यतिरिक्त यातील होळीचे गीतही वगळण्यात येणार आहे. आनंद खऱ्या आयुष्यात विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे प्रेरणा देतो, तोच भाग वाढवण्यात येणार आहे. कारण चीनमध्येही शिक्षणाला खूप महत्त्व आहे. चीनची स्थिती आणि ऑडीयन्स लक्षात घेवून सिनेमात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याचे माहिती समोर येते आहे. तसेच खुद्द हृतिक रोशन वेळात वेळ काढून सिनेमाचे प्रमोशनसाठी चीनला जाणार आहे. चीनमध्ये सिनेमाचे खास प्रमोशन करण्यात येईल.विशेष म्हणजे रूपेरी पडद्यावर 'सुपर 30' च्या यशाचा फायदा 'वॉर' सिनेमालाही झाला.
‘सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.