सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांचा सगळ्यात आवडता कार्यक्रम असून छोट्या स्पर्धकांच्या विलक्षण नृत्य अविष्काराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे विजेतेपद आता कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असून दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात. आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 18:25 IST
आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे
ठळक मुद्दे मुंबईतील एका प्रख्यात हॉस्पिटलमधील कर्करोगपीडित मुले त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना समर्थन देण्यासाठी सेटवर आले होते आणि त्यामुळे सेटवर त्यांचा वेळ अतिशय मजेत गेला.