Join us

सुपरहीरो टायगर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 3:43 AM

अभिनेता टायगर श्रॉफला बच्चेकंपनीसह एन्जॉय करायला आवडतं. त्यांच्यासह तो जास्त रमतो. खुद्द टायगरनं याचा खुलासा केलाय. टायगरचा लवकरच ‘फ्लाइंग जट’ सिनेमा

अभिनेता टायगर श्रॉफला बच्चेकंपनीसह एन्जॉय करायला आवडतं. त्यांच्यासह तो जास्त रमतो. खुद्द टायगरनं याचा खुलासा केलाय. टायगरचा लवकरच ‘फ्लाइंग जट’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. याच पार्श्वभूमीवर टायगरने ‘लोकमत सीएनएक्स’शी खास संवाद साधला. या वेळी टायगरनं सिनेमा आणि इतर गोष्टींबद्दल भरभरून गप्पा मारल्या.आगामी सिनेमाचं छोट्या दोस्तांसह प्रमोशन करतोय. तर यामागे काही खास कारण?- लहान मुलं मनानं निर्मळ असतात. ती कुणालाही जज करीत नाहीत, हसतमुख असतात. त्यांच्या मनात काहीही नसतं. त्यामुळे मला लहान मुलांसह वेळ घालवायला, त्यांच्यासह एन्जॉय करायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये मी खूप रमतो. आपल्यासमोर कुणी सुपरहीरो आहे की हीरो आहे, याची त्यांना पर्वा नसते. ती फक्त आनंदी असतात. त्यामुळे लहान मुलांसह माझ्या आगामी ‘फ्लाइंग जट’ सिनेमाचं प्रमोशन करतोय.‘फ्लाइंग जट’ हा सिनेमा सुपरहीरोवर आधारित आहे. तर, या सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल?- या सिनेमात मी साकारत असलेला मुलगा खूप साधाभोळा आहे. अचानक त्याला चमत्कारिक शक्ती प्राप्त होते. हा सुपरहीरो आजवरील सुपरहीरोंपेक्षा वेगळा ठरेल, असं मला वाटतं. शक्ती मिळाल्यावर तिचं काय करावं, हे त्या मुलाला कळत नाही. ही शक्ती मिळाल्यामुळे त्याच्या आईला मात्र आनंद होतो.सुपरहीरो साकारण्यासाठी कुणाला ना कुणाला नजरेसमोर ठेवलं असशील. स्पायडरमॅनबद्दल तुझ्या काही विशेष भावना आहेत. त्याही जाणून घ्यायला आवडतील.- लहानपणापासून मला स्पायडरमॅनसारखं बनायचं होतं. मी जे काही करेन ते स्पायडरमॅनसारखंच, असं वाटायचं. कारण, सुपरहीरो जरी असला, तरी स्पायडरमॅनमध्ये मानवी गुण आहेत. शक्ती असल्या, तरी तो कमजोर वाटतो. त्यामुळे मी स्वत:ला त्याच्याशी रिलेट करतो. म्हणूनच कधी ना कधी मला स्पायडरमॅन बनायचंय.सुपरहीरो बनण्याचा विचार करणं आणि तो प्रत्यक्ष साकारणं, यात खूप फरक आहे. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली?- बालपणापासूनच सुपरहीरो बनण्याची इच्छा होती. कधीतरी सुपरहीरो बनावं, असं वाटायचं. माझा पहिला सिनेमा सुपरहीरोवर आधारित असावा, असंही वाटायचं. ती इच्छा पहिल्या सिनेमात पूर्ण झाली नसली, तरी तिसऱ्या सिनेमात प्रत्यक्षात येतेय, याचा सर्वाधिक आनंद आहे. त्यामुळे सुपरहीरो बनण्याची तयारी तर मी लहानपणापासूनच करीत होतो, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. या सिनेमात अ‍ॅक्शन आहे. उड्या मारणं, उडणं सारंकाही आहे. अ‍ॅक्शनसाठी बरीच मेहनत घेतलीय. कारण सुपरहीरो साकारणं, अ‍ॅक्शन करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. ही भूमिका साकारण्यासाठी मी माझ्यासमोर जॅकी चॅनचा आदर्श ठेवला. कारण तो अ‍ॅक्शन करता-करता कॉमेडीही तितक्याच सहजतेनं करतो. हा सिनेमाही त्याच प्रकारातील म्हणजे अ‍ॅक्शन-कॉमेडी आहे. यात मार्शल आर्टचाही वापर आहे. ‘बागी’सारखंच मार्शल तुम्हाला भासेल; मात्र सुपरहीरो आणि त्याची शक्ती यात वेगळेपण आहे. शिवाय, भाषेसाठी पंजाबीचे धडेसुद्धा घेतले आहेत.सुपरहीरोवर आधारित बरेच सिनेमे आलेत. तर, हा सिनेमा बघताना रसिकांना तेच ते बघतोय असं वाटणार नाही का?- नाही वाटणार! कारण शक्ती मिळाली तरी यातील नायक हा खूप साधेपणाने राहतो. इतकंच नाही, तर त्याच्या आईसाठी, कितीही शक्ती आली, तरी तो एक साधाभोळा मुलगाच आहे. त्यामुळे हा मुलगा कधी शक्ती वापरत असेल, उडत असेल त्याच वेळी त्याची आई त्याला फोन करते. त्याला बाजारात जायला सांगते. आईच्या सांगण्यावरून हा सुपरहीरो मग बाजारात जाऊन खरेदी करतो. अशा खूप साध्या-साध्या गोष्टी तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळतील. सुपरहीरो असूनही त्याचा बडेजाव तुम्हाला दिसणार नाही.या सिनेमातून एक सामाजिक संदेशही देण्यात आलाय का?- फ्लाइंग जट या सिनेमातून एक सामाजिक संदेश देण्यात आलाय. हा संदेश पर्यावरणसंवर्धनाचा आहे. तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल, तरच फ्लाइंग जटला शक्ती मिळते. ‘पर्यावरण स्वच्छ ठेवा’ असा आजच्या काळातील सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा सिनेमा देतोय, याचा आनंद आहे.‘मुन्ना मायकल’ या सिनेमात बहिणीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत किती एक्सायटेड आहेस?- ‘मुन्ना मायकल’ सिनेमात कृष्णासुद्धा काम करणार आहे. तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. कारण, शूटिंगसाठी मी बाहेर असताना माझ्या कुटुंबाला मिस करतो. यानिमित्ताने ती माझ्यासोबत राहील. ती माझी एक क्रिटिकसुद्धा आहे. त्यामुळे एकत्र काम करण्याचा अनुभव नक्कीच स्पेशल ठरेल.

- Exclusive

suvarna.jain@lokmat.com