जगभरात प्रसिद्ध असलेली सुपरमॉडेल बेला हदीदने ( Bella Hadid) मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि तिची ती पोस्ट वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचावला. या पोस्टमध्ये बेलाचे रडतानाचे फोटो बघून सगळ्यांनाच धक्का बसला. जगभर खळबळ माजली. अमाप संपत्तीची धनी असलेली, ग्लॅमरच्या जगात मोठं नाव असलेली बेला का रडतेय? असा प्रश्न अनेकांना पडला.25 वर्षाची बेला हदीद सुपरमॉडेल आहे. जगातील हाऐस्ट पेड मॉडेल आहेत. 200 कोटी रूपयांपेक्षा अधिक संपत्तीची मालकीन आहे. सोशल मीडियावर तिचे 5 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. जगभरातील कोट्यवधी लोक तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. ती अनेकांसाठी रोल मॉडेल आहे. पण हीच बेला दीर्घकाळापासून मानसिक आजाराशी, डिप्रेशनशी लढतेय. अनेक वर्षांपासून तिच्या अनेक रात्री रडण्यात गेल्या. अनेकदा तर दिवसाची सुरूवातही रडत झाली.बेलाने हॉलिवूड स्टार विल स्मिथची मुलगी विलो स्मिथसोबत एक क्लिप शेअर केली आहे. यात ती मानसिक आरोग्य, असुरक्षिततेची भावना यावर बोलतेय. या व्हिडीओसोबत बेलाने रडतानाचे काही फोटोही शेअर केले आहेत. ‘सोशल मीडिया एक आभासी जग आहे आणि यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत,’ असे तिने म्हटले आहे. अशा आभासी जगावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवण्याचे आवाहनही तिने केले आहे.
काय म्हणाली बेला?मला माझ्या भावना कुणासोबतही शेअर करायची इच्छा नव्हती. पण आता मी फॅन्ससोबत या भावना शेअर करतेय. मी अनेकदा दिवसरात्र नुसती रडत असते. जवळपास प्रत्येकाची हीच स्थिती आहे. सर्व बैचेन आहेत. आपण आयुष्यात काय करतोय, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सोशल मीडियावर सर्व गोष्टी चांगल्या दिसतात. पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं. मी अनेकदा बर्न आऊट व ब्रेक डाऊनची शिकार ठरली आहे. बर्न आऊटच्या स्थितीत व्यक्तिचं मन प्रचंड थकतं. इतकं की काम करण्याची ऊर्जाचं संपते. ब्रेक डाऊनमध्ये व्यक्ती आतून कोलमडतो. त्याला मार्ग सुचेनासा होतो आणि तो सतत अश्रू गाळण्यास विवश होतो.