Join us

सख्ख्या भावाला आमिर खानने घरात ठेवलं होतं डांबून?; मानसिक रोगी म्हणून दिली होती अशी वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:07 IST

faisal khan: फैसल कलाविश्वातून एकाएकी नाहीसा झाला. मात्र, पुन्हा कमबॅक केल्यावर त्याने आमिरवर गंभीर आरोप केले.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) वर्षाकाठी केवळ एखादा चित्रपट करतो. मात्र, त्याने केलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो. आमिर चित्रपटांची निवड करताना खूप बारकाईने विचार करतो त्यामुळे त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येणारा आमिर मध्यंतरी त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो त्याच्या कुटुंबामुळे चर्चेत आला आहे. आमिरने एकेकाळी त्याच्या सख्य़ा भावाला घरात डांबून ठेवल्याचं म्हटलं जात आहे.

आमिरचा भाऊ फैसल खान (faisal khan) याच्याविषयी सगळ्यांनाच ठावूक असेल. फैसलने त्याच्या करिअरमध्ये फार मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, त्याला फारसं यश आलं नाही. ज्यामुळे त्याने कलाविश्वातून काढता पाय घेतला. परंतु, याच फैसलला मानसिक रोगी म्हणत आमिरने घरात डांबून ठेवलं होतं. एका मुलाखतीत फैसलने याविषयी खुलासा केला.

फैसलने १९८८ मध्ये 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. पण, हा सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर त्याने 'तुम मेरे हो' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं. त्याने 'मदहोश','मेला, 'चांद बुज गया' या सिनेमांमध्येही काम केलं. मात्र, त्यात तो फारशी  यशस्वी कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर तो कलाविश्वातून एकाएकी नाहीसा झाला. मात्र, मागच्या वर्षी त्याने आमिरवर गंभीर आरोप करत प्रकाशझोतात आला.

फैसलने केले आमिरवर गंभीर आरोप

गेल्या वर्षी फैसलने एका मुलाखतीत आमिर आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. आमिरने त्याच्या कुटुंबियांसह मला मानसिक आजारी म्हणत घरात डांबून ठेवलं होतं. इतकंच नाही तर, मला चुकीची औषधं दिली. ज्यामुळे मला खूप त्रास झाला. त्याच्या या आरोपांनंतर कलाविश्वात एकच खळबळ माजली. मात्र, यावर आमिरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सत्य अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 

टॅग्स :आमिर खानफैजल खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा