Join us  

वडिलांच्या पावलावर पाऊल! अल्लू अर्जुनच्या लेकीची कलाविश्वात दमदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:05 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुलगी एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर मोठा पगडा असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच अलीकडील पुष्पा द राइज हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला असून, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. अल्लू अर्जुननंतर आता त्याची लहान मुलगी हीदेखील कलाविश्वास पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री समांथा रुथ प्रभूसोबत एका चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभू ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. आता समांथाच्या आगामी चित्रपट ‘शकुंतलम’मधील लूक प्रदर्शित झाला आहे. समांथाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ‘शकुंतलम’ चित्रपटातील लूक शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये समांथा ही शकुंतलाच्या लूकमध्ये दिसत आहे. अलीकडेच समांथाचा घटस्फोट झाला असून, त्यानंतर तिचा हा पहिला चित्रपट आहे.

अल्लू अर्जुनच्या लेकीची कलाविश्वात दमदार एन्ट्री

अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा देखील या चित्रपटात दिसणार आहे. ती चित्रपटात प्रिंस भरत ही भूमिका साकारणार आहे. शाकुंतलम चित्रपटात समांथासोबत देव मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शकुंतलाच्या भूमिकेत समांथा दिसणार आहे तर देव मोहन दुष्यंतची भूमिका साकारणार आहे. याआधी समांथा ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचे ऊ अंटवा हे गाणे चर्चेत होते. त्यानंतर आता ती ‘शकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर यशोदा आणि Kaathu Vaakula Rendu Kaadhal या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले.  

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीTollywood