अभिनेता कमल हसनचं खासगी आयुष्य विविध अभिनेत्रींशी असलेल्या संबंधांमुळे तितकेच वादग्रस्त राहिले आहे. 1970 साली कमल हसन आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री श्रीविद्याच्या प्रेमात पडला. दोघांचं अफेअर बराच काळ सुरु होतं. मात्र यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2006 साली श्रीविद्यानं जगाचा निरोप घेतला त्याआधी तिला भेटण्यासाठी कमल आवर्जून पोहचला होता.
श्रीविद्याशी ब्रेकअप झाल्यानंतर 1978 साली 24 वर्षीय कमल हसनचे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या डान्सर वाणी गणपतीशी सूत जुळले. दोघांचे अफेअर काही काळ सुरु होतं. यानंतर कमल हसन आणि अभिनेत्री सारिका एकत्र राहू लागले. दोघंही लिव इनमध्ये राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. 1988 साली सारिकानं श्रुतीला जन्म दिला आणि त्यानंतर कमल हसननं सारिकाशी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सारिकानं अभिनयाच्या करिअरला अलविदा केला आणि संसारात रमली. 1991 साली तिने अक्षराला जन्म दिला. मात्र 2002 साली कमल आणि सारिका यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.
यानंतरही 2 लेकींचा बाप असलेल्या कमल हसनच्या अफेअरच्या चर्चा काही थांबल्या नाहीत. सारिकाशी घटस्फोट झाल्यानंतर कमल हसन आपल्यापेक्षा वयाने 22 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्री सिमरन बग्गा हिला डेट करु लागला. मात्र यानंतर सिमरन हिनं आपल्या बालपणीच्या मित्रासह लग्न केलं आणि कमलसह असलेलं नातं संपवलं. यानंतर कमल हसनच्या जीवनात आणखी एका अभिनेत्रीचा प्रवेश झाला. कमलच्या जीवनात गौतमी तडीमल्ला आली.
दोघंही 2005 ते 2016 या कालावधीत लिव इन रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघंही सहमतीने वेगळे झाले. याची माहिती खुद्द गौतमीनेच दिली. सध्या श्रुती, अक्षरा आणि गौतमीची मुलगी शुभलक्ष्मी एकत्रच राहतात.