कलर्स मराठीवरील 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये सुरांची मैफल रंगणार आहे. विविध शैलीतील गाणीगाऊन अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मन जिंकलेले 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' कार्यक्रमातील टॉप सहा आणि मॉनिटर या आठवड्यात म्हणजेच शनिवारी अस्सल पाहुणे इरसाल नमुनेच्या मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मकरंद अनासपुरे यांच्यासोबत गप्पांबरोबर गाण्याची मैफल देखील रंगणार आहे.
स्वरालीने 'मेरे रश्के कमर' तर सगळ्या छोट्या सूरविरांनी शूर आम्ही सरदार तसेच नवरी नटली ही गाणी सादर केली. इतकेच नाही तर 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाच्या या पर्वाचे शीर्षक गीत आणि 'या रे या सारे या' ही गाणी देखील सादर केली. ज्याला सगळ्यांच्या लाडक्या मॉनिटरने देखील साथ दिली. उत्कर्ष, सई आणि आंशिकाने देखील त्यांची आवडती गाणी सादर केली आणि खूप सुंदर मैफल रंगली. हर्षदने नटसम्राट या सिनेमातला संवाद सादर करून सगळ्यांना पुन्हा एकदा थक्क केले. तसेच हर्षदने 'काठी न घोंगड' हे गाणे देखील सादर केले. हर्षदने जेव्हा मकरंद अनासपुरे यांच्याच सिनेमातील 'काळी माती' हे गाणे गायले तेव्हा मुलांसोबत मकरंद अनासपुरे यांनी देखील ठेका धरला. हर्षदने अत्यंत सुरेखरीत्या हे गाणे सादर करून सगळ्यांची मने जिंकली.तेव्हा 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' यांच्यासोबत रंगलेला विशेष भाग शनिवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर वाहिनीवर बघायला विसरू नका.