साधाभोळा, निर्मळ मनाचा सूरज चव्हाण (Suraj Chavan)अशी ओळख असलेला बिग बॉसचा हा सदस्य थेट विजेताही झाला. बारामतीच्या सूरजने बिग बॉस मराठी सीझन ५ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. सूरज गरीब घरातून आला असून टिक टॉक वरील व्हिडिओंमुळे तो खूप व्हायरल झाला होता. बिग बॉसच्या घरातही तो गावाकडेच्या आठवणी सांगायचा. ट्रॉफी मिळाली तर आधी जेजुरीला जाणार असं तो म्हणाला होता. त्याप्रमाणे सूरजने आज जेजुरीला पोहोचला होता. तसंच नंतर गावी पोहोचल्यावर त्याचं लोकांनी जोरदार स्वागत केलं. याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
सूरज चव्हाणची बारामतीतील मोढवे गावातला आहे. बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर त्याचं गावी जंगी स्वागत झालं. एकदम झापूक झुपूक स्टाईलमध्ये त्याने गावात एन्ट्री घेतली. गावकऱ्यांनी सूरजची विजयी रॅली काढली. गावात बेफाम नाचणारा सूरज् गाडीच्या रुफमधून बाहेर येत मस्त नाचला. सर्वत्र गुलालाची उधळण करण्यात आली. यानंतर त्याने त्याच्या शाळेलाही भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांना खूप शिका म्हणून प्रोत्साहन दिलं.
सूरज चव्हाण लवकरच केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' सिनेमातही दिसणार आहे. केदार शिंदेंनी 'बाईपण भारी देवा' नंतर या सिनेमाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुखने सूरजसाठी एक विश्वासातला माणूस अपॉइंट केला आहे. सूरजला कोणीही फसवू नये यासाठी तो माणूस त्याचं काम बघणार आहे.
सूरजला काय बक्षीस मिळालं?सूरज चव्हाण विजेता ठरल्यानंतर बक्षीसात १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी. तसेच दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि इलेक्ट्रिक बाईक मिळाली.