Join us

'कोणाशी कसं वागावं हे त्याला ..'; रणबीरचं वागणं पाहून अभिनेत्याने केला होता नीतू कपूरला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 15:45 IST

Suresh oberoi: सुरेश ओबेरॉय यांनी animal या सिनेमात रणबीरच्या आजोबांची भूमिका साकारली आहे.

संदिप रेड्डी वांगा यांच्या  animal या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने जवळपास ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे.  त्यामुळे हा सिनेमा सातत्याने चर्चेत येत आहे. या सिनेमात अभिनेता सुरेश ओबेरॉय ( Suresh oberoi) महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले असून त्यांनी रणबीरच्या (ranbir kapoor) आजोबांची भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी रणबीरविषयी आणि त्याच्या संस्कारांविषयी भाष्य केलं आहे.

सुरेश ओबेरॉय यांनी अलिकडेच लेहरेन रेट्रो या युट्यूब चॅनेल मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेमा आणि रणबीर कपूर याच्याविषयी भाष्य केलं. सोबतच रणबीरचं सेटवरचं वागणं पाहून त्यांनी अभिनेत्री आणि रणबीरची आई नीतू कपूर यांना मेसेज केला होता.

"रणबीर एक उत्तम व्यक्ती आणि तितकाच उत्तम अभिनेता आहे. तो इतरांशी फार व्यवस्थित वागतो. ऋषी आणि नीतू यांनी त्याला फार चांगले संस्कार दिले आहेत. रणबीरसोबत काम केल्यानंतर मी नीतू यांना मेसेज सुद्धा केला होता. तुम्ही तुमच्या मुलाला फार चांगले संस्कार दिले आहेत. कोणाशी कसं वागावं हे त्याला बरोबर कळतं, असा मेसेज मी नीतूला केला होता", असं सुरेश ओबेरॉय म्हणाले.

दरम्यान,  animal मध्ये रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. शक्ती कपूरने सुद्धा रणबीरचं कौतुक केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत तृप्ति डिमरी, उपेंद्र लिमये, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना यांसारखी तगडी स्टारकास्ट झळकली आहे.

टॅग्स :सुरेश ऑबेरॉयबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा