Join us

"विजय 69' मुळे मला क्रिकेटच्या प्रवासातील संघर्ष पुन्हा आठवला", सुरेश रैनाची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:15 IST

Suresh Raina Praises On Anupam Kher's Vijay 69

टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना क्रिकेटविश्वात घडणाऱ्या घडामोडींवर सातत्याने भाष्य करत असतो. आता तो क्रिकेट नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. नुकतंच सुरेश रैना याने अभिनेते अनुपम खेर यांचा 'विजय 69' हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'विजय 69' या चित्रपटाने त्याच्या क्रिकेटच्या प्रवासातील संघर्षाची आठवण करून दिली असल्याचं त्याने म्हटलं आहे.

सुरेश रैना X (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर केली. त्यात त्याने चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत लिहलं, "नेटफ्लिक्सवर  'विजय 69' पाहिल. खरंच अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटातील संदेश आणि भावना खूप सुंदर आहेत. चित्रपट पाहताना मला माझ्या त्या काळाची आठवण झाली, जेव्हा मी माझ्यासमोर कितीही अडथळे आले तरीही भारतासाठी खेळण्याचं स्वप्न सोडलं नव्हतं. अनुपम खेर हे तुमचं आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट काम आहे".

रैनाने पुढे लिहिलं, "मी क्वचितच चित्रपट पाहताना भावनिक होतो, पण या चित्रपटाने मला खूपच भावूक केलं. मला वाटतं प्रत्येकाच्या आत एक 'विजय मैथ्यू' असतो. मला आशा आहे की प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या स्वप्नांचा कधीही त्याग करू नका. इच्छाशक्तीने तुम्ही ते नक्कीच साध्य करू शकता. अनुपमजी 'विजय 69' मधील तुमच्या प्रेरणादायी कामासाठी मनःपूर्वक धन्यवाद. हा चित्रपट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे". 

दरम्यान, अनुपम खेर यांच्या 'विजय 69' या चित्रपटात दाखवलेला संदेश अनेकांच्या हृदयाला भिडणारा आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. अनुपम खेरशिवाय चंकी पांडेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेलं आहे.  'विजय 69' या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉय यांनी केले असून चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे 

टॅग्स :सुरेश रैनाअनुपम खेरसेलिब्रिटीसिनेमा