ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.5 - सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा मागणा-यांना प्रसिद्ध लेखक चेतन भगतने आपल्या शैलीमध्ये फटकारले आहे. 'सर्जिकल स्ट्राईक सर्वांना दाखवायला ते काही स्टिंग ऑपरेशन किंवा सेक्स टेप नाही', असं म्हणत चेतन भगतने पुरावा मागणा-यांना चांगलेच फटकारले आहे. 'जर तुमचा देशाच्या लष्करावर विश्वास नसेल, तर तुमच्यात काहीतरी खोट आहे', असे देखील चेतनने ट्विटमध्ये म्हटले आहे. 'काही राजकीय पक्ष भारतीय लष्करासंदर्भात शंका उपस्थित करत आहेत, हे धक्कादायक आहे. यामुळे देश दुखावला गेला आहे',असेही चेतनने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
आणखी बातम्या
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रसेचे मुंबई अध्यक्ष संजीव निरुपम यांनी सरकारकडे सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी केली होती. यावरुन या दोघांवर चौफर टीका करण्यात आली. चेतन भगतने देखील ट्विटरच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागण्यांवर ताशेरे ओढले आहेत.
#SurgicalStrike is not a sting operation or sex tape to be played on TRP hungry TV. If u don't believe your own Army, problem lies with you.— Chetan Bhagat (@chetan_bhagat) October 3, 2016
Stop gloating. Stop asking for counter to #SurgicalStrike. Stop asking for videos of dead bodies as proof. Don't provoke more violence pls!— Chetan Bhagat (@chetan_bhagat) October 3, 2016
Stunned and shocked that some political parties are questioning the Indian Army and it's official statements publicly.Only hurts the nation— Chetan Bhagat (@chetan_bhagat) October 4, 2016