आपल्या बाजूला अनेक घडामोडी घडत असतात. याच गोष्टी चित्रपटाच्या रुपात मांडल्या जातात. त्यामुळेच की काय सिनेमा समाजाचा आरसा असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींपासूनच या सिनेमांच्या कथा प्रेरित असतात. अशाच एका सत्य घटनेवर आधारित एक संवेदनशील कथा दिग्दर्शक ज्ञानवेल रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे.तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतलाय.
अमेझॉनवर तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. सध्या सर्वत्रच सिनेमाची जोरदार चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता सूर्यानं पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स दिला आहे. सत्य घटनांवर या सिनेमाने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत.सिनेमात ज्वलंत विषयावर थेट भाष्य करण्यात आले आहे. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा सिनेमा आहे.
सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देत पसंती देत असल्याचे पाहायला मिळतंय. याशिवाय आयएमडीबीवरही या सिनेमाला भारतीय श्रेणीत अव्वल स्थान मिळवत सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.सगळेच सिनेमाविषयी कौतुक करत ट्विट करताना दिसत आहेत. सूर्यानं देखील ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले आहेत तसेच या कौतुकाने आनंद झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.