सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचं या व्यक्तीमुळे झालं ब्रेकअप, एका सेल्फीमुळे तुटलं ६ वर्षांचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:49 PM2023-06-14T16:49:30+5:302023-06-14T16:52:25+5:30

Sushant Singh Rajput And Ankita Lokhande : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे ६ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

Sushant Singh Rajput and Ankita Lokhande broke up because of this person, their relationship of 6 years broke due to a selfie. | सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचं या व्यक्तीमुळे झालं ब्रेकअप, एका सेल्फीमुळे तुटलं ६ वर्षांचं नातं

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेचं या व्यक्तीमुळे झालं ब्रेकअप, एका सेल्फीमुळे तुटलं ६ वर्षांचं नातं

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)च्या मृत्यूला आज ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ जून २०२० हा तोच दुर्दैवी दिवस होता जेव्हा सुशांतने जगाचा कायमचा निरोप घेऊन निघून गेला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता, मात्र त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)ला सर्वात मोठा धक्का बसला होता. सुशांत आणि अंकिता लोखंडेची प्रेमकहाणी आजही स्मरणात आहे. खरंतर दोघांची भेट २००९ मध्ये 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर झाली होती.

'पवित्र रिश्ता'च्या शूटिंगदरम्यान अंकिता आणि सुशांत सिंग राजपूत एकमेकांच्या जवळ आले आणि इथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. सुशांत आणि अंकिता जवळपास ६ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते आणि त्यांना लग्न करायचे होते. सुशांत सिंग राजपूतनेही 'झलक दिखला जा'च्या सेटवर अंकिताला लग्नासाठी प्रपोज केले आणि अंकितानेही होकार दिला. पण जेव्हा सुशांत चित्रपटांकडे वळला तेव्हा दोघांच्या नात्यात तडा जाऊ लागला.

अंकिता झाली होती खूप नाराज

'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा एकत्र दिसले होते. या चित्रपटात दोघांनी लिपलॉक केले होते, त्यामुळे अंकिता खूप नाराज होती. वृत्तांनुसार, सुशांतच्या एका मित्राने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'शुद्ध देसी रोमान्स' दरम्यान हे दोन्ही को-स्टार दोन वर्षांपासून विजानच्या ऑफिसमध्ये जायचे, जे अंकिताला आवडत नव्हते. याशिवाय मोठ्या पडद्यावर सुशांत आणि परिणीतीच्या लिप लॉकमुळेही अंकिता खूप नाराज होती. रिपोर्ट्सनुसार, अंकिताने स्टुडिओ कॅन्टीनमध्ये सुशांत सिंग राजपूतला थापडही मारली होती.

हे आहे ब्रेकअपमागेच खरे कारण

अंकिता सुशांत सिंग राजपूतबद्दल खूप असुरक्षित होती आणि हेच त्यांच्या ब्रेकअपचे कारण बनले. सुशांतने अंकिताला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण अंकिताला पटले नाही आणि अखेर दोघांचे ब्रेकअप झाले.

Web Title: Sushant Singh Rajput and Ankita Lokhande broke up because of this person, their relationship of 6 years broke due to a selfie.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.