सीबीआय आणि एनसीबीनं सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर या घटनेला वेगळंच वळणं आलं. रोज नवनवीन खुलासे होत गेले. सुशांत सिंह राजपूतच ड्रग्ज घ्यायचा, आपला ड्रग्जशी काहीही संबंध नाही, मी कधीही ड्रग्सशी चव चाखलेली नाही असं रिया चक्रवर्ती अनेकदा सांगत होती. मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीनंतर अखेर रियाने आपलं ड्रग्ज कनेक्शन असल्याचं सत्य सांगितलं आणि तिला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान सुरूवातीला आपल्यावरील ड्रग्जचे आरोप मान्य करायला रिया तयार नव्हती.
मात्र तरीही एनसीबीने तिच्यावरील चौकशीचा फास अधिकच आवळला, कारण एनसीबीला याबाबत ठोस पुरावे सापडले होते. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकने केलेल्या एका चुकीमुळे रियावरील एनसीबीचा संशय अधिक वाढला होता. जेव्हा एनसीबी रिया, तिचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंतच्या बँक खात्याची छाननी करत होते, तेव्हाच त्यांना रियाच्या कार्डवरून झालेला एक आर्थिक व्यवहार सापडला होता.
रियाच्या कार्डवरून ड्रग्स डिलर्सची व्यवहार
रियाच्या कार्डवरून एका ड्रग डिलराला गांज्याचे पैसे देण्यात आले होते. शोविकने काही महिन्यांपूर्वीच सॅम्युअल मिरांडाला एका ड्रग्ज डिलरकडे बड आणण्यासाठी पाठवलं होतं. मात्र घाईघाईत सॅम्युअल पैसे घेऊन जायला विसरला. तिथं पोहोचल्यावर सॅम्युअलने शोविकला फोन केला आणि पेमेंट द्यायला सांगितलं. तेव्हा शोविकने सॅम्युअलला रियाच्या कार्डने पैसै द्यायला सांगितले. ड्रग्स डिलरसह रियाचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दिसल्यानेच रियावरील एनसीबीसमोर रियाच्या कार्डनं ड्रग डिलरला पैसे दिल्याचं उघड झालं.
ड्रग्ज खरेदीसाठी सर्वात जास्त पैसे सुशांतच्या अकाऊंटमधून जात होते. कारण सॅम्युअल मिरांडाकडेच घरच्या कामासांठी पैसै पुरवले जायचे आणि या पैशांतून सॅम्युअलमार्फत ड्रग्ज खरेदी केले जायचे. याबाबत अनेक व्हॉट्सअॅप चॅटदेखील पुरावे आहेत. तसंच रिया ड्रग्स घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सॅम्युअल सुट्टीवर होता आणि सागरी आणि हवाई मार्गाने ड्रग्ज येणं बंद झालं होतं. त्यामुळे मुंबईतील ड्रग्ज डिलर्सकडे ड्रग्ज कमी प्रमाणात पोहोचायचे. त्यावेळी शोविकने स्वत: ड्रग्ज डिलर्सशी कित्येक वेळा संपर्क केला. लॉकडाऊनच्या आधीदेखील शोविकने बासित परिहार, जैद आणि केजान इब्राहिम यांच्याकडून ड्रग्ज खरेदी करायचा. शोविकने ही चूक केली नसती तर कदाचित रिया या प्रकरणात अडकण्यापासून वाचली असती.
सुशांतच्या घरून रियाने स्वत:च्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा
सुशांत सिंग राजपूत केस मध्ये ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीचा तपासही महत्वाचा ठरत आहे. एनसीबीला त्यांच्या तपासात आढळून आले की, लॉकडाऊन दरम्यान सुशांत सिंग राजपूतचा काही दिवस रिया चक्रवर्तीच्या घरी घालवायचे होते. यासाठी रिया आणि सुशांतने निर्णय घेतला की, एका फास्ट डिलिव्हरी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून गांजा रियाच्या घरी पाठवला जावा. चौकशीतून ही बाब कन्फर्म झाली होती
एका रिपोर्टनुसार, एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्ती, शौविक आणि इतरांच्या जबाबातून समजले की, सुशांत आणि रियानने घरच्या काही सामानासोबत एका बॉक्समध्ये जवळपास अर्धा किलो गांजा एप्रिल महिन्यात रियाच्या घरी पाठवला होता. तपासातून असेही समोर आले की, हे काम सुशांतकडे काम करणा-या दीपेश सावंतने केले होते़ त्याने कुरिअर कंपनीला हे सामान रियाच्या सांताक्रूज येथील फ्लॅटवर डिलिव्हर करण्यास सांगितले होते़ रियाच्या घरी हे गांजाचे पॅकेट शौविकने रिसीव्ह केले होते़
हे पण वाचा-
दीड वर्षांपासून घरी बसलाय शाहरूख खान, पण तरीही सलमान, अक्षयपेक्षा आहे दुप्पट ‘रईस’
शाहरूख खानने का नाकारला ‘स्लमडॉग मिलेनियर’? हैराण करणारे आहे कारण